ETV Bharat / state

Manoj Jarange Patil Sabha : विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षण पारित करा; मनोज जरांगेंची मागणी - मराठा आरक्षण मागणी

Manoj Jarange Patil Sabha : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करत आहेत. जरांगे पाटलांची शुक्रवारी पुण्यातील राजगुरुनगरमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. या सभेसाठी राज्यभरातील अनेक मराठा बांधव सभेच्या ठिकाणी पोहोचले होते.

Manoj jarange patil Sabha Live Updates
Manoj jarange patil Sabha Live Updates
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 10:06 AM IST

Updated : Oct 20, 2023, 3:08 PM IST

पुणे : Manoj Jarange Patil Sabha : आमरण उपोषण करून मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला जेरीस आणलेले मनोज जरांगे पाटील आता थेट मैदानात उतरले आहेत. राज्य सरकारला आरक्षणासाठी महिनाभराचा अवधी देऊनही राज्य सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्यानं मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. दुसरीकडं जालन्यातील सुनिल कावळे या तरुणांने मराठा आरक्षणाकरिता मुंबईत आत्महत्या केली आहे.

कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही : मराठा समाजातील (Maratha Reservation) एका बांधवाने गुरुवारी आत्महत्या केली होती. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. मराठा समाज सुनिल कावळेंचे (Sunil Kawale Suicide) बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्यांच्या कुटुबियांची मराठा समाज काळजी घेणार आहे. कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही, असा हुंकार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. आतापर्यंत झालेल्या मराठा समाजाच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.

शांततेत आरक्षण मिळवणार : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. ठोकल्याशिवाय मागण्या पूर्ण होत नाहीत, अशी एकेकाळी मराठा समाजाची भावना होती, पण, आता शांततेत आरक्षण मिळवणार असा शब्द आहे. मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय समाज एक इंचही मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. मराठा समाज माझा मायबाप आहे. मायबापाच्या शब्दापुढे मी जात नाही. आपल्या वाट्याला कष्ट आले. परंतु, लेकरांच्या वाट्याला हे कष्ट नको. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की पुरावे लागतात. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने एक महिन्यांचा वेळ मागितला. सरकारला आपण चाळीस दिवसांचा वेळ दिला. आपण मुदत दिल्यानंतर हालचालीनंतर वेग आला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव सभेसाठी उपस्थित : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील खेड येथे सभा झाली. सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेतला. पुणे जिल्ह्यातून त्याचबरोबर अन्य ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव सभास्थळी दाखल झाले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

51 जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण : राज्याचे नव्हे, तर सबंध देशाचे लक्ष वेधणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सध्या सभांचा धडाका लावलाय. जरांगे पाटील यांनी शुक्रवारी खेड तालुक्यात देखील 100 एकरमध्ये सभा पार पडली. जरांगे पाटील हे जेव्हा सभास्थळी आले, तेव्हा जवळपास 51 जेसीबींच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. 50 पोलीस अधिकाऱ्यांच्यासह 500 पोलीस हे बंदोबस्ताला तैनात होते.

हेही वाचा-

  1. Maratha Reservation Suicide: मुंबईत सणवार येत राहतील पण...मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची मुंबईत आत्महत्या
  2. Gunaratna Sadavarte On Jarange Patil : जरांगे पाटील यांच्या सभेची गुणरत्न सदावर्तेंनी घेतली फिरकी, पवारांवरही निशाणा
  3. Manoj Jarange Patil Sabha Today : मनोज जरांगे पाटील यांची आज राजगुरुनगरमध्ये सभा; लाखो मराठे एकवटणार, पहा ग्राउंड रिपोर्ट

Last Updated : Oct 20, 2023, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.