ETV Bharat / state

Manchar Bhagwan Topi : देशभरात मंचर टोपीची क्रेझ; वर्षाला लाखोंची उलाढाल, भगवान टोपी मंचरच्या अर्थकरणाचा बनली कणा - उपमुख्यमंत्री अजित पवार

Manchar Bhagwan Topi: महाराष्ट्रातील गावागावात टोपी घालण्याची परंपरा ही खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तर पुण्यातील मंचरची 'भगवान टोपी' सध्या देशभर पसंतीला उतरत आहे. दिग्गज नेत्यांना देखील याची भुरळ पडली आहे. भगवान टोपीची बाजारात मोठ्या प्रमामावर मागणी आहे.

Manchar Bhagwan Topi
देशभरात मंचर टोपीची क्रेझ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 2:16 PM IST

पुणे : Manchar Bhagwan Topi: पुणे जिल्ह्यातील मंचर हे गाव सध्या वेगळ्या व्यवसायाने चर्चेत आहे. मंचर गावातील भगवान टोपी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पसंतीला उतरली आहे. भगवान टोपीची बाजारात मोठ्या प्रमामावर मागणी आहे. वडिलांनी सुरु केलेला व्यवसाय मुलाने मोठ करत मंचरच्या अर्थकरणाराला गती देण्याचं काम भुते कुटुंबाने केले आहे.
या टोपीची युवक, जेष्ठ नागरिकांसह राजकारण्यांना देखील भुरळ पडली आहे.

जगभरात पोहचली टोपीची ओळख : आंबेगाव तालुक्यात मंचर गावात तयार होणारी भगवान टोपी तिला मंचर टोपी म्हणून देखील ओळखले जाते. आज या टोपीची ओळख जगभरात पोहचली आहे. टोपीला प्रत्येक शुभकार्यात वापरले जाते. त्यामुळे तिचे अनन्यसाधारण असे माहत्व आहे. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे भगवान भुते हे चाळीस वर्षांपूर्वी पुण्यात आले होते. त्यांनंतर त्यांनी छोट्या प्रमाणावर कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण करण्याकरिता टोपी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.

टोपिला 'भगवान टोपी' नाव : कॉटन कापडाला खळ लावून ती टोपी एकदम कडक पद्धतीने इस्त्री करून ते बाजारात विकू लागले. हळूहळू त्या टोपीला मागणी वाढू लागली. त्यानंतर भगवान यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा अरुण भगवान भुते यांनी हा व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांनी हा व्यवसाय वाढवला. त्यांनी या टोपीला आपल्या वडिलांचे नाव "भगवान टोपी " ( Bhagwan Topi ) दिले. तेव्हापासून या टोपीला भगवान टोपी म्हंटले जाते. पुढे पुढे या टोपीला मंचर टोपी देखील संबोधले जाऊ लागले.

अनेकांना रोजगार उपलब्ध : भुते यांच्या या टोपीच्या व्यवसायातून 40 ते 50 महिलांना आणि 25 पेक्षा ज्यास्त पुरुषांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या टोपीसाठी कॉटनचे कापड वापरले जाते. साधारण ही एक टोपी पूर्णपणे बनवायला ५ मिनिटांचा कालावधी लागतो. ४० ते ५० महिलांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याच बरोबर एका दिवसात जवळपास 3 ते 4 हजार टोप्या तयार केल्या जातात. बाजारात या टोपीची किंमत 15 , 20 , 25 आणि 35 रुपये आहे.

जगभरातून टोपीला मागणी : भुते यांच्या या टोपीला जगतभरतून मागणी वाढत आहे. प्रत्येक गावात भगवान टोपी वापरली जाते. या टोपीत पांढरी, गोल्डन आणि भगवी टोपी असे प्रकार आहेत. लग्न कार्यात या टोपीला विशेष मागणी असते. दररोज साडे तीन ते चार हजार टोपी शिवल्या जातात. त्यामुळे मंचर शहारत तयार होणारी ही टोपी जरी असली तरी तिला जगभरातून मागणी वाढली आहे. एवढंच नाही तर अरुण भुते यांनी ही कला अनेकांना शिकवली असून त्यांनी स्वतच्या व्यवसाय सुरू करून कुटुंबासाठी हातभार लावत आहेत. अरुण भुते यांनी वडिलांच्या नावाने सुरू केलेली "भगवान टोपी" ची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच असल्याचे पहायला मिळत आहे.

गणेशउत्सवात टोपीला सगळ्यात ज्यास्त मागणी : भगवान टोपीला खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचबरोबर गणेश उत्सव ( Ganeshotsav 2023 ) आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देखील या टोपीची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. गणेश उत्सवा दरम्यान मुंबईच्या लालबाग राजा येथे दरवर्षी पाच हजार भगवान टोपीची ऑर्डर असते, तर पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ( Dagdusheth Halwai Ganapati ) मंडळाला देखील 5 हजार टोप्या जातात. त्याचबरोबर इतर गणेश मंडळांना हजार, पाचशे या स्वरूपात टोप्या जातात. बाजारात टोपींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे नेहमीच टोपीचे शॉर्टएज असते. आमच्या सारखी टोपी इतर कुणीही बनवू शकता नाही असे देखील अरुण भुते यांनी सांगितले आहे.

राजकारण्यांना टोपीची भुरळ : दिवंगत खासदार किसनराव बानखेले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे ही टोपी राजधानी दिल्लीत दाखल झाली. म्हणूनच आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ( Ajit Pawar) दिलीप वळसे पाटील यांना देखील याच टोपीची भुरळ पडलेली आहे.

कशी असते टोपी बनवण्याची पद्धत : सुरुवातीला टोपीला आकारानुसार कापले जाते. त्यानंतर त्याला कामगारांकडून अवघ्या १ मिनिटात शिवले जाते. त्यानंतर ती शिवलेली टोपीला कडक खळ लावून काही वेळ ती तशीच ठेवली जाते. त्यानंतर तिला वजनदार इस्त्रीने कडक केली जाते. ही टोपी गाडी चालवताना कितीही हवा आली तरी उडणार नाही असा दावा, भुते यांनी केला आहे. त्याचबरोबर या व्यवसायातून दार महिन्याला 50 ते 60 रुपयर निव्वळ नफा होत असून, वर्षाला लाखों रुपयांची उलाढाल होते.

टोपीला मोठ्या प्रमाणावर मागणी : देशभर अनेकांच्या डोक्यावर मंचरची भगवान टोपी पहायला मिळते. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांचे जेव्हा जंतर मंतर येथे आंदोपन होते त्यावेळी आमच्या येथून जवळपास 1 लाख टोप्या पाठवल्या गेल्या होत्या. टोपीवर मी आण्णा हजारे लिहून पाठवले होते. त्यापूर्वी टोपीची छप्पई होत नव्हती, मात्र त्यानंतर मागणी वाढली आणि व्यवसायाला गती मिळाली. बाजारात या टोपीला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे देखील भुते यांनी संगितले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ही टोपी घातली जाते. आमच्या व्यवसायानंतर अनेक महिला या आमच्याकडून प्रशिक्षित होऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून, त्यांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा -

  1. Qaraquli caps : श्रीनगरमधील प्रसिद्ध काराकुली टोप्यांचे दुकान, इथली टोपी मोदींपासून जिनांपर्यंत अनेकांनी घातली आहे
  2. औरंगाबादच्या बाजारपेठेत 'पंखा टोपी' ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू
  3. दिसायलाही देखणी अन् हाताळायला सोपी... भंडारा पोलिसांना मिळाली नवीन टोपी

माहिती देताना टोपी व्यावसायिक अरुण भुते,

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.