ETV Bharat / state

पुण्यात 21 वर्षीय तरूणाचा खून, समलैंगिक संबंधातून हत्या केल्याचा पोलिसांना संशय - पुण्यात 21 वर्षीय तरूणाचा खून

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे. 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. महेश डोके (21) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Pune Crime News
21 वर्षीय तरूणाची हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 6:55 PM IST

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे

पुणे Pune Crime News : पुण्यात गुंडगिरीने चांगलेच डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात (Pune Crime) वाढत असल्याचं दिसून येतंय. पुण्यातील वाघोली परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समलिंगी संबंधातून वाघोली परिसरात एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. महेश डोके (Mahesh Doke) (वय 21) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो बीजीएस कॉलेज (BGS College Pune) वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. वाडेबोल्हाई येथील एका वसतीगृहात वास्तव्यास होता.

समलैंगिक संबंधातून वार : लोणीकंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाल्याने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात (Sasoon Hospital Pune) हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीत तरुणाचा मृत्यू झाला. सदर युवक हा वाघोली येथे बीजीएस कॉलेजच्या बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. येथे तो एका होस्टेलमध्ये राहात होता. तपासा दरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार सदरची हत्या ही समलैंगिक संबंधातून झाल्याची दाट शकता आहे. परंतु, नेमक्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

लवकरच आरोपीला अटक : लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Nagpur Crime : दारू पिण्याच्या वादातून तरुणाची हत्या, 15 दिवसांमधील सहा हत्या; नागपूर हादरले
  2. Satara Crime : अनैतिक संबंधातून विवाहित तरूणाची हत्या; शेतात पुरला मृतदेह, पत्नीसह एक ताब्यात
  3. भिवंडीत तरुणाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.