ETV Bharat / state

24 तासात वीज पुरवठा पूर्ववत झाल्याने मलठण ग्रामस्थांनी मानले ऊर्जामंत्र्यांचे आभार

author img

By

Published : Sep 13, 2020, 8:12 PM IST

शिरुर तालुक्यातील मलठण गावात रोहित्रावर वीज पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्रामस्थांनी याबाबत उर्जामंत्री नितीन राऊत यांना माहिती दिली होती. उर्जा मंत्र्यांनी याची दखल घेत सूचना दिल्याने 24 तासात रोहित्र बदलण्यात आले आणि वीज पुरवठा पूर्ववत झाल्याने मलठण ग्रामस्थांनी नितीन राऊत यांचे आभार मानले आहेत.

Nitin Raut
नितीन राऊत

पुणे- दोन दिवसांपूर्वी वादळी पावसात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या मलठण गावातील 100 /22 केव्हीए गावठाण रोहित्रावर वीज पडल्याने तो नादुरूस्त झाला होता. यामुळे या रोहित्रावरील घरगुती आणि शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे हे रोहित्र बसवून देण्यासाठी गावकऱ्यांनी शुक्रवारी विनंती केली होती. राऊत यांच्याकडून याची दखल घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर 24 तासात रोहित्र बदलत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांनी ऊर्जा मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

विलासराव थोरात

मलठण ग्रामस्थांच्या तक्रारीची ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तात्काळ दखल घेतली. राऊत यांच्याकडून बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांना मलठणमधील रोहित्र तात्काळ बदलून देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रोहित्र बदलून 24 तासाच्या आत वीज पुरवठा सुरळीत केला, अशी माहिती मलठणचे माजी सरपंच विलासराव थोरात यांनी दिली आहे.

हेही वाचा-महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पडली; तरुणांच्या मदतीमुळे प्रवासी सुखरुप

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबत केलेल्या तात्काळ कार्यवाही केल्याबाबत मलठण ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत. वीज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे शेतीला पाणी देण्यास अडचण निर्माण होणार नाही, असे थोरात यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.