बारामती - ज्येष्ठ नेते शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा ( Minister Nitin Gadkari ) ऊस साखर कारखानदारी मधील गाढा अभ्यास आहे. त्यांनी ऊसापासून साखर बनवण्याऐवजी थेट इथेनॉल तयार ( Make Ethanol From Sugar cane ) करा. त्यापासून परकीय चलन वाचवण्यात मदत होईल, असा सल्ला दिला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ( Dcm Ajit Pawar ) दिली. एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान शुभारंभ व शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवार ( 7 मे ) माळेगाव इंजिनिअरींग कॉलेजच्या शरद सभागृहामध्ये करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, पावसाळा चांगला झाला, तर पुढील वर्षी ऊसाचे वजन चांगले भरेल. त्यामुळे कदाचित आम्हाला ऑक्टोबरमध्ये देखील ऊसाच्या गाळपासाठी परवानगी द्यावी लागेल. कारण, पुन्हा पुढील वर्षी मे महिना उजाडला तर मजुर थकुन जातो. तसेच, हार्वेस्टरला देखील मर्यादा आहेत. आम्ही पुन्हा हार्वेस्टरला अनुदान देण्याबाबत विचार करत आहोत.
सध्या पेट्रोलचा दर १२० रूपये प्रतिलिटर आहे. तर इथेनॉलचा दर ६२ रूपये प्रतिलिटर आहे. हा दर निम्म्याने कमी आहे. ट्रॅक्टर व वाहने त्यांच्या इंजिनमध्ये काही तांत्रिक बदल करून इथेनॉलवर चालवण्याबाबतचे निर्णय घ्यावे लागेल. मुख्यमंत्री ठाकरेंनी ऊसाशी संबधित असलेल्या मंत्र्यांना तुम्ही फक्त ऊसाचे पिक घेता, अन्य पिकांचा विचार का करत नाही, असे विचारले. सध्या सोयाबीन, कापूस या पिकाला चांगला दर आहे. बारामती, फलटण परिसरात पूर्वी कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते, असेही उपमुख्यमंत्री पवारांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Inter Caste Marriage in Amravati : आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीला आई-वडिलांनी पतीच्या घरून नेले फरफटत