पुणे- गेल्या चार दिवसांपासून पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात परतीच्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यात, भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अद्याप सरकार दरबारातील अधिकारी, कर्मचारी न आल्याने पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. दरम्यान प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.
परतीच्या पावसाचे थैमान.. मावळमध्ये भात पिकाचे मोठे नुकसान - Heavy rain on Sunday night
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात मावळ मधील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच्या पावसातून काही प्रमाणात भात शेती बचावली होती. आता मात्र, मावळमधील बहुतांश भात शेतीचे नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांचे म्हणणं आहे.
मावळमध्ये भात पिकाचे मोठे नुकसान