ETV Bharat / state

Pune Crime : तू सुंदर दिसत नाहीस... जर्मनीतील नोकरही तुझ्यापेक्षा सुंदर आहेत, असे म्हणत पत्नीचा छळ; पतीवर गुन्हा दाखल - Maids In Germany

सध्या गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी पती पत्नीची भांडण तर कधी प्रेम प्रकरणातून खुनाची घटना अश्या घटना घडत असताना पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तू सुंदर दिसत नाहीस, जर्मनीतील नोकरही तुझ्यापेक्षा सुंदर आहेत, असे म्हणत पत्नीला हिणवणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime
तू सुंदर दिसत नाहीस असे म्हणत पत्नीचा छळ
author img

By

Published : Jan 28, 2023, 9:57 AM IST

पुणे : तु सुंदर दिसत नाही तु मला आवडत नाहीस तु वेडसर आहे. तुला मॉर्डन मुलीसारखे राहणे जमत नाही. तु लो स्टँडर्ड आहेस. जर्मनीमधील नोकर बायका तुझ्या पेक्षा चांगल्या आहेत. असे म्हणत पत्नीला हिणवणार्‍या पतीवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन योगराज ग्रोवर (43, रा. सेरेनो पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर सध्या रा. जर्मनी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 41 वर्षीय महिलेनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कौटुंबिक हिंसचार प्रकरणी गुन्हा दाखल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह पवन ग्रोवर यांच्याशी झाला. सासरी दिल्ली आणि औंध येथे नांदत असताना तिचा कौटुंबिक छळ झाल्याचा प्रकार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पवनने त्याच्या पत्नीला तु सुंदर दिसत नाही, तु मला आवडत नाहीस, तु वेडसर आहे, तुला मॉर्डन मुलीसारखे राहणे जमत नाही, तु लो स्टँडर्ड आहेस. जर्मनीमधील नोकर बायका तुझ्या पेक्षा चांगल्या आहेत, असे म्हणत पत्नीला हिनवणार्‍या व माहेरी जाण्यास सांगितले. तसेच तूला पुर्णपणे बरबाद करून टाकेल अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. पतीवर धमकावणे व कौटुंबिक हिंसचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2006 पासून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी जर्मनीत काम करतो : मिळलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्य़ादी हे उच्चशिक्षित आहेत. त्यांचे 2006 मध्ये लग्न झाले आहे. आरोपी जर्मनीत काम करतो. तो त्याठिकाणी स्थायिक झाला आहे. लग्न झाल्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेस यांना त्रास देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दिल्लीतील गुडगाव त्यानंतर पुण्यातील औंध आणि बाणेर येथे राहात असताना आरोपीने पत्नीचा छळ केला.

हेही वाचा : Pune Crime लहान बहिणीशी अश्लील चाळे करणाऱ्या विवाहित बहिणीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.