ETV Bharat / state

राज्यातील बाजार समित्यांनी बारामती बाजार समितीचे अनुकरण करावे; सतीश सोनी

author img

By

Published : Mar 19, 2021, 7:11 PM IST

Updated : Mar 19, 2021, 7:39 PM IST

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हित जोपासत शेतकऱ्यांना उपयुक्त असणारे विविध प्रकल्प राबवत असून, हे काम उल्लेखनीय आहे. राज्यातील बाजार समित्यांनी बारामती बाजार समितीला भेट देऊन त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन सोनी यांनी केले.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती

बारामती- बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम अनुकरणीय असून, राज्यातील बाजार समित्यांनी बारामती बाजार समितीला भेट द्यावी. त्याचे अनुकरण करावे, असे आव्हान महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी केले. सोनी आज बारामती दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हित जोपासत शेतकऱ्यांना उपयुक्त असणारे विविध प्रकल्प राबवत असून, हे काम उल्लेखनीय आहे, असे मत सोनी यांनी व्यक्त केले आहे.

सतीश सोनी
बाजार समित्या टिकवण्यासाठीचे धोरण.... पणनमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्था, इतर संस्था या सर्वांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. कोरोना काळात राज्यातील सर्वच बाजार समित्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.बाजार समितीच्या संदर्भात नव्याने केलेल्या कायद्यानुसार उत्पन्न आणि साधने कमी झाल्यावर बाजार समित्या टिकल्या पाहिजेत.या दृष्टीने सरकार नव्याने धोरण आखत आहे. बाजार समित्यांचा सेस म्हणून उत्पन्न जरी कमी झाले. तरी इतर उत्पादनाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्प पणन संचालयानामार्फत हाती घेण्यात येत आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा करण्यात येईल असेही सोनी यांनी सांगितले.

हेही वाचा- Antilia Explosives Scare : फॉरेन्सिक टीमकडून गाड्यांची तपासणी सुरु

बाजार समितीच्या उत्पन्नवाढीचे प्रकल्प...
बाजार समित्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी बाजार समितीच्या आवारात असणारे शेतीपूरक व्यवसायासाठीचे गाळे अधिकाधिक कसे वाढवता येतील. तसेच विजेची बचत करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प राबवता येतील का, सीएनजी पंप, पेट्रोल पंप उभारणे, बाजार समितीकडे जर पैसे नसेल तर स्वारस्य अभिव्यक्ती राबून काही करता येईल का. यासंदर्भात विचारविनिमय सुरू असून लवकरच शासनामार्फत जाहीर केले जातील.अशी माहिती सोनी यांनी दिली.

बारामती हे महाराष्ट्रातील एक आदर्श व समृद्ध तालुका...
नियोजनबद्ध रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, सर्वत्र स्वच्छता तसेच येथील नगरपालिकेची इमारत, प्रशासकीय भवन, आरटीओ कार्यालय अतिशय सुंदर असून त्याची देखभाल ही सुंदर ठेवली जात आहे. जिल्हा पातळीवरील सर्व सुविधा या ठिकाणी आहेत. बारामती हे महाराष्ट्रातील एक आदर्श व समृद्ध तालुका असल्याचे सोनी म्हणाले..

हेही वाचा- कोरोना वाढला! अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मुलुंड कोरोनाचे 'हॉटस्पॉट'

Last Updated : Mar 19, 2021, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.