ETV Bharat / state

'शासन आपल्या दारी कार्यक्रमात' सरकारची उधळपट्टी, खर्चावर श्वेतपत्रिका काढा-सुप्रिया सुळे - सुप्रिया सुळे अजित पवार

मुख्यमंत्र्यांनाच मुंबईच्या रस्त्यावर साफसफाई करावी लागते, असा टोला राष्ट्रवादीच्या ( शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदेंना लगावलाय. आज पुण्यातील कर्वेनगर विकास कामाचं भूमिपूजन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावरील खर्चाबाबतही प्रश्न उपस्थित केले.

NCP MP Supriya Sule
सुप्रिया सुळे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 1:26 PM IST

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

पुणे : मुख्यमंत्री, महापौरपदात मोठा फरक असतो. मुख्यमंत्र्यांनी धोरण ठरवायचं असतं तर अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करायची असते. मात्र, मुंबईच्या रस्त्याचीच साफसफाई मुख्यमंत्र्यांना करावी लागते, असा टोला राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावाला आहे. मुंबईत स्वच्छता चांगली आहे. पण मुंबई महापालिकेचे आयुक्त चहलही चांगले अधिकारी आहेत. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

  • महापौर, मुख्यमंत्र्यांची कामं वेगवेगळी : महापौर, मुख्यमंत्र्यांची कामं वेगवेगळी आहेत. याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करायला हवा, असंदेखील खासदार सुळे यांनी म्हटलंय. हे काम करण्यापेक्षा राज्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका कशा घेता येतील हे पाहावं, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
  • राज्य सरकारमध्ये चढाओढ : पुण्यातील कर्वेनगर भागामध्ये विविध विकास कामाचं भूमिपूजन आज सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं दिली. खासदार सुळे म्हणाल्या, राज्य सरकारमध्ये चढाओढ दिसतेय. त्यामुळं कधी मुख्यमंत्री लवकर येतात. तर कधी उपमुख्यमंत्री रोज सकाळी येतात. यातूनच त्यांच्यात स्पर्धा असल्याचं दिसून येतयं.

राज्य सरकारची पैशांची उधळपट्टी : सरकार राज्यभर 'शासन आपल्या दारी कार्यक्रम' राबत आहे. त्यासाठी शिंदे सरकानं एक कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप सुळे यांनी केलीय. तंत्रज्ञानाचा वापरू करूनदेखील हा कार्यक्रम राबवता येईल. मात्र, सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचं सुळे यांनी म्हटलंय. तसंच या सर्व खर्चावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केलीय.

मराठा आरक्षणासा पाठिंबा : मराठा आरक्षणासाठी सात दिवसांत मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचे परिपत्रक राज्य सरकारनं आयोगालe जारी केलंय. एवढी सगळी माहिती गोळा कशी करायी हे फक्त त्यांना माहिती आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण देत असेल, तर आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मराठा लिंगायत, धनगर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. आमचा मराठा आरक्षणासा पाठिंबाच असल्याचं सुळे यांनी म्हटलंय. मात्र, सरकार खरंच आरक्षण देणार का? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केलाय.

  • भाजपा आमदारांवर कारवाई करा : भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. त्यामुळं भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी खासाद सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

    हेही वाचा -
  1. 31 जानेवारीला कोस्टल रोड होणार सुरू- मुख्यमंत्र्यांची घोषणा
  2. माजी आमदार मेवाराम जैन काँग्रेसमधून निलंबित, नेमकं कारण काय?
  3. महायुतीतील घटक पक्षात नाराजी; कोणाची मनं झाली 'कडू', कोणी म्हणते कुरबूर नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.