ETV Bharat / state

Maharashtra Kesari Final : महाराष्ट्र केसरीची आज अंतिम लढत, 'या' मल्लांमध्ये रंगणार सामना - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ

Maharashtra Kesari Final : पुण्यातील फुलगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आज अंतिम लढत होणार आहे. या लढतीकडं कुस्तीप्रेमीचं लक्ष लागणार आहे.

Maharashtra Kesari Final
Maharashtra Kesari Final
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 10:35 AM IST

पुणे Maharashtra Kesari Final : पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं सुरू असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आलीय. आज या स्पर्धेची अंतिम लढत पार पडणार आहे. यात माती विभागात सिंकदर शेख आणि संदीप मोटे तर गादी विभागात हर्षद कोकाटे आणि शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत होणार आहे. यातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी खिताबाची लढत खेळविली जाणार आहे. प्रदीप कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्यानं 66वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यातील फुलगाव इथं आयोजित करण्यात आलीय.

गादीवरील अंतिम लढतीत हर्षदची गाठ शिवराज राक्षे सोबत : गादीवरील चुरशीच्या लढतीत हर्षद कोकाटेनं पृथ्वीराज पाटीलचं आव्हान सहज परतवून लावलं. पहिल्या फेरीत सुरुवातीलाच हर्षदनं ताबा मिळवत दोन गुणांनी खाते उघडले. पृथ्वीराजनं काहीसा बचावात्मक पवित्रा घेत कुस्ती बाहेर काढत एक गुण मिळवला. याच आघाडीवर पहिली फेरी संपली. दुसऱ्या फेरीला पुन्हा एकदा हर्षदनं ताबा मिळवत दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर पृथ्वीराजनं एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. हर्षदनं त्याला दाद दिली नाही. पृथ्वीराजनं कुस्ती बाहेर काढत एक गुण मिळविला. त्यानंतर हर्षदनं एकेरी पट काढण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला. यावेळी पृथ्वीराजनं ठेवलेली पायाची पकड कमालीची मजबूत होती. त्यावेळी पृथ्वीराजने पलटी मारत 2 गुणांची कमाई केली. अखेरच्या टप्प्यात पुन्हा एकदा हर्षदनं दोन गुणांची कमाई केली आणि विजय निसटणार नाही याची काळजी घेतली. गादीवरील अंतिम फेरीत हर्षदची गाठ आता शिवराज राक्षेशी पडणार आहे. शिवराज राक्षेनं प्रतिस्पर्धी सुदर्शन कोतकरला संधीच दिली नाही. अनेकदा कुस्ती बाहेर काढत शिवराजनं एकेक गुणांचा सपाटा लावला. वेगवान कुस्ती करण्याच्या प्रयत्नात त्यानं ताबा मिळवत भारंदाज डावाचा सुरेख उपयोग करुन सुदर्शनला निष्प्रभ करून 10-0 अशा तांत्रिक वर्चस्वावर विजय मिळविला.

संदीप सिंकदरमध्ये मातीवरील अंतिम लढत : मातीवरील उपांत्य फेरीच्या लढतीत सांगलीच्या संदीप मोटेनं मुंबई शहराच्या विक्रम भोसलेचा गुणांवर 10-1 असा पराभव केला. विक्रमचा ताबा आणि भारंदाज डावाचा पुरेपूर फायदा उठवत संदीपनं विक्रमला फारशी संधी दिली नाही. विक्रमला पहिल्या फेरीत लढत बाहेर काढण्याची संधी मिळाली तेवढाच एकमात्र गुण विक्रमला मिळवता आला. झपाट्यासारखी कुस्ती करणाऱ्या वाशीमच्या सिकंदर शेखसमोर मातीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत पुणे शहरच्या पृथ्वीराज मोहोळनं तगडं आव्हान उभं केलं. समान ताकदीच्या मल्लांनी ताकद आजमविण्यात वेळ घालवला. यासाठी दोघानांही पंचानी कुस्ती करण्याची ताकिद दिली. लढतीत पुन्हा तशीच वेळ आली तेव्हा सिंकदरला ताकिद दिली. त्या वेळी सिंकदरला गुण मिळविण्यात अपयश आल्यानं पृथ्वीराजला 1 गुण देण्यात आला. पृथ्वीराजनं मध्यंतराला ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली तेव्हा पृथ्वीराजला ताकिद मिळाली आणि त्याला गुण मिळवण्यात अपयश आल्यानं सिकंदरला एक गुण देण्यात आला. यानंतरही दोघांचा कल नकारात्मक कुस्ती करण्याकडेच राहिला. दुसऱ्यांदा ताकीद मिळाल्यावर सिकंदर गुण मिळवण्यात अपयश आल्यानं पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला. पाठोपाठ याच नियमाच्या आधारावर सिंकदरला 1 गुण मिळाल्याने लढत 2-2 अशीच बरोबरीत राहिली. मात्र, अखेरचा गुण सिकंदरनं मिळविल्यामुळं सिकंदरला विजयी घोषित करण्यात आलं.

हेही वाचा :

  1. Sangli Bailgada Sharyat: थार गाडीसाठी बैलगाडी शर्यतींचा पार पडला थरार; बकासुर आणि महीब्याने पटकावली थार
  2. Maharashtra Kesari Umpire Threat : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचाला जीवे मारण्याची धमकी, कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.