पुणे: राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आज होणार असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पोस्टल मतदानामध्ये आघाडीवर आहेत. यापूर्वीच महविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सकाळीच ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली आहे. लाल महालात येऊन पाहणी केली आहे. भारतीय जनता पक्षाने यामध्ये पैशाचा पाऊस पडला. परंतु विजय आणि पराभव यापेक्षा जनता ही महत्त्वाची आहे. जनतेचा विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवणे हे माझे काम आहे. विजय तर माझा निश्चित होईल आणि तो जनताच करेल असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
विजय जनतेचा असणार: आतापर्यंत मी सात वेळा निवडणुका लढवल्या आहेत. परंतु इतक्या खालच्या स्तरावरची निवडणूक मी कधीच पाहिली नाही. खेळणी निवडणुका व्हायचे त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने यंत्रणेचा गैरवापर केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, देशाचे नेते, राज्याचे नेते, कसबेच्या जनतेला भेटायला आले यातच माझा विजय आहे. आज मी विजय होणारच असा विश्वास सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे. कसब्याची निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती. जनतेनेच मला निवडून देण्याचा ठरवले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक पैशाची केली. यापुढे पैशाशिवाय कार्यकर्ता निवडून येणार नाही अशी स्थिती भारतीय जनता पार्टीने कसब्यामध्ये केली होती. परंतु जनता माझ्या पाठीशी होती आणि आज मी विजयी होऊन गुलाल उधळणार. तो जनतेचा विजय असणार असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलेला आहे. आज सकाळी आठ वाजता कसबा पोट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मताची मोजणी होत असून या मतांमध्ये रवींद्र धनगर हेमंत रासने यांच्या पुढे दोनशे मताने आघाडीवर आहेत. त्यामुळे आता दिवसभरामध्ये किती आघाडी भेटणार आणि कोण विजय होणार त्याचे लक्ष आता महाराष्ट्रसह राज्यांमध्ये सुद्धा लागलेला आहे.
दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास : महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तर मी 15 हजार मताधिक्याने विजयी होणार असल्याचे सांगितले आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी मी 25 हजार मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत पहायला मिळाली.