ETV Bharat / state

फुकट मिळालेल्या सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष आहे. त्यांना झोपेमध्ये स्वप्न पडतात, त्यांच्याकडे फुकटची मिळालेली सत्ता आहे. या सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, तुम्ही जर नम्रपणे वागलात तर सर्व गोष्टी मार्गी लागतील. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीमध्ये मुंगी होऊन साखर खायची असते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Nov 19, 2020, 9:21 PM IST

राजगुरूनगर (पुणे) - भारतीय जनता पक्ष हवेवर चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष आहे. त्यांना झोपेमध्ये स्वप्न पडतात, त्यांच्याकडे फुकटची मिळालेली सत्ता आहे. या सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, तुम्ही जर नम्रपणे वागलात तर सर्व गोष्टी मार्गी लागतील. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीमध्ये मुंगी होऊन साखर खायची असते. अशाप्रकारे उघडपणे बोलणे यापुढे आम्ही सहन करणार नाही, अशा कडक शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना प्रतिउत्तर दिले. पाटील राजगुरूनगर येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीविषयी आयोजित मेळाव्यादरम्यान माध्यमांशी बोलत होते.

फुकट मिळालेल्या सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

नाचता येईना अंगण वाकडं अशी सरकारची अवस्था
राज्यातील वाढीव वीज बिलांबाबत आरोप-प्रत्यारोप होत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकारच्या म्हणण्यानुसार राज्यातील लोकांनी वाढीव आलेली वीज बीले भरावी का..? 600 रुपयांचे बील 6 हजार आले, 700 रुपयांचे वीज बील 21 हजार आले आहे. ही वीज बिले लोकांनी भरावी का? आणि तुम्ही म्हणता वीज बिलांचे निर्णय आधीच्या सरकारने केलेत. मग आधीच्या सरकारने केले तर मग सरकार तुम्ही डोक्यावर घेतले कशाला? मागच्या सरकारने केले असले तरी आम्ही व्यवस्थित करू, असे म्हणत काम करण्याची आमच्यात धमक आहे. आम्ही सक्षमपणे निर्णय घेतले असते. नाचता येईना अंगण वाकडं, अशा शब्दात सरकारला चिमटा काढत वीज बिलाबाबत सरकारला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी लक्ष केले.
सोमवारपासून वीज बिलांबाबत आंदोलन
मागच्या सरकारच्या काळात महावितरण फायद्यात चालले होते. त्यावेळी महावितरणने प्राप्तिकर भरला आहे, आता राज्य सरकारला वीज बिलाबाबत लोकांना न्याय देता येत नाही आणि भाजपवर आरोप केले जात आहेत. वीज बिलाबाबत सोमवारपासून प्रखरेने मोठे आंदोलन उभे करणार आहे. राज्यात वीज बिलाबाबत मनसे आक्रमकतेने आंदोलन करत आहे. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी सरकारच्या विरोधातील भूमिका मात्र एक असून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आंदोलनाचे हत्यार मोठ्या ताकदीने उभे करणार असल्याचे पाटील म्हणाले.
आता जाणता राजा झोपला का
राज्यातील मंदिरे अनलॉकनंतर बंद ठेवली जात असताना जनतेला राज्यभर मोठा संघर्ष करावा लागला. साधु-संताना अटक करण्यात आली, प्रत्येक गोष्टी आंदोलने करून मिळवाव्या लागतात. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगत असते छत्रपतींच्या काळात रयतेला त्यांच्या हक्क मागण्यासाठी कधी संघर्ष करावा लागला नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना "जाणता राजा" म्हणतात आणि आता ज्यांना "जाणता राजा" म्हणतात ते काय झोपलेत का? अशा शब्दात नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पाटलांनी लक्ष्य केले.
वीज बिलाच्या मदतीसाठी उर्जा खात्याने प्रस्ताव दिला मात्र वित्त खात्याने फेटाळला..?
कल्याणकारी राज्यामध्ये लोकांना फायदा मिळवून देण्यासाठीचे निर्णय घेऊन वेळप्रसंगी राज्यसरकारला कर्ज काढावे लागते. राज्य सरकारला उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबायला लागतात. सामान्य नागरिकांना सेवा देणारी एसटी, वीज कंपनी कधी नफा मिळविण्यासाठी चालवायची नसते. सरकार नफा कमविण्यासाठी नसते, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा या तोट्यात चालवायच्या असतात. यासाठी राज्यसरकारने वीज कंपन्यांना भरीव मदत करावी, असा प्रस्ताव उर्जा खात्याने दिला. मात्र, वित्त खात्याने तो फेटाळल्याचा आरोप करत चंद्रकांत पाटलांनी सरकारवर टीका केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.