पुणे - पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळाली आहे. मेगाभरती व मेगागळतीने येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आत्तापर्यंतची मतमोजणी पाहिली तर या विभागात आघाडीने कमबॅक केलेले पाहायला मिळत आहे.
LIVE अपडेट -
- कागल राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ विजयी
- शाहुवाडी जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे विजयी
- कोल्हापूर काँग्रेसमधून ऋतुराज पाटील विजयी
- इस्लामपूरमधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विजयी
- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा धक्कादायक पराभव
- शिरूरमधून राष्ट्रवादीचे अशोक पवार विजयी
- मावळमधून राष्ट्रवादीचे सुनिल शेळके विजयी
- सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे विजयी
- इंदापूरमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विजयी
- इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आघाडीवर
- कसब्यातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी
- हडपसरमधून राष्ट्रावादीचे चेतन तुपे विजयी
- बार्शीतून सेनेचे दिलीप सोपल आघाडीवर
- सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बबन शिंदे विजयी
- पश्चिम महाराष्ट्रात आघाडीची मुसंडी
- पुणे जिल्ह्यात आघाडीची मुसंडी
- साताऱ्यातून उदयनराजे भोसले ८० हजारांनी पिछाडीवर
- बारामतीमधून अजित पवारांना ३५ हजारांची आघाडी
- सातऱ्यातून भाजपचे शिवेंद्रराजे आघाडीवर
- सोलापूर शहर मध्य मधून प्रणिती शिंदे पिछाडीवर
- कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर
- साताऱ्यातून उदयनराजे पिछाडीवर
- सांगलीतून राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील तासगावमधून आघाडीवर
- करमाळ्यातून सेनेचे बंडखोर नारायण पाटील आघाडीवर
- सोलापूर दक्षिण मंत्री सुभाष देशमूख आघाडीवर
- अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आघाडीवर
- बार्शीतून अपक्ष राजेंद्र राऊत आघाडीवर
- कोल्हपूरमधून ऋतुराज पाटील आघाडीवर
- कोथरुडमधून चंद्रकांत पाटील आघाडीवर
- पंढरपूरमधून भारत भालके आघाडीवर
- माढ्यातून बबन शिंदे आघाडीवर
- पोस्टल मतमोजणीत आघाडीची आघाडी
- अजित पवार बारामतीत आघाडीवर
- पश्चिम महाराष्ट्रात आघाडी आघाडीवर
- पोस्टल मतमोजणीला सुरुवात; महायुतीची आघाडी
2014 ची राजकीय परिस्थिती -
2014 च्या आधी पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यानंतर झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट आली आणि राष्ट्रवादीचा गड आकडेवारीच्या नजरेतून भाजपने काबीज केला. शिवसेनेनेही चांगली कामगिरी करत 12 ठिकाणी विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादीचे 16 उमेदवार निवडूण आले होते.हेही वाचा - दृष्टीहीन विद्यार्थिनींनी जल्लोषात साजरी केली दिवाळी2019 ची राजकीय परिस्थिती -सध्या आघाडीतील अनेक नेते, आमदार हे युतीत दाखल झाले आहेत. साताऱयात उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे साताऱयात काय निकाल लागतो याकडे राज्यासह दिल्लीचेही लक्ष लागले आहे. कोल्हापुरात धनंजय महाडिक हे देखील भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे मागील काही काळापासून झालेल्या मेगाभरतीमुळे पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लक्षवेधी लढत -
सातारा - शिवेंद्रराजे भोसले Vs दिपक पवारकराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) Vs अतुल भोसले (भाजप), उदय उंडाळकर पाटील (अपक्ष)कोथरुड - चंद्रकांत पाटील(भाजप) Vs किशोर शिंदे (मनसे)मावळ - बाळा भेगडे (भाजप) Vs सुनील शेळके (राष्ट्रवादी)इंदापूर - हर्षवर्धन पाटील (भाजप) Vs दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी)कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) Vs समरजीत घाटगे(अपक्ष)करमाळा - रश्मी बागल (शिवसेना) Vs संजय शिंदे (राष्ट्रवादी पुरस्कृत)सोलापूर दक्षिण - प्रणिती शिंदे (काँग्रेस) Vs दिलीप माने (शिवसेना)