ETV Bharat / state

महाडीबीटी पोर्टलवरुन शेती निगडीत विविध बाबींसाठी अर्ज करता येणार - baramati taluka news

कृषी विभागाने आता महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे.

प्रशासकीय इमारत
प्रशासकीय इमारत
author img

By

Published : Dec 21, 2020, 10:17 PM IST

बारामती (पुणे) - कृषी विभागाने आता महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींसाठी अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.

या संकेतस्थळावरून अर्ज करा

महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादीच्या माध्यमातून दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

शेतकऱ्यांनी आधार क्रमांक प्रमाणित करुन घ्यावा

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करूइच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

31 डिसेंबर पर्यंत मुदत

पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाइन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र, लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करु शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषी विषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी दिनांक 31 डिसेंबर, 2020 अखेर पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत सर्व प्राप्त अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. तरी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे अवाहन तालुका कृषी अधिकारी बारामती दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.

हेही वाचा - मंगळसूत्र चोरटे बारामती पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा - लोणावळ्यात पर्यटकाला बेदम मारहाण; अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.