ETV Bharat / state

'अजित पवारांना दाखवून द्या, आम्ही पण तुमचे बाप आहोत' - bjp traders union kothrud pune

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपा व्यापारी संघटनेच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित केले. भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. जगातील 90 टक्के देशांच्या लोकसंख्येपेक्षा भाजपाची सदस्य संख्या ही जास्त असल्याचा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Oct 10, 2020, 4:04 PM IST

Updated : Oct 10, 2020, 4:36 PM IST

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दाखवून द्या, आम्ही तुमचे बाप आहोत, असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. कोथरूड विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे येथील कार्यक्रमात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.

पुणे महानगर पालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपा पुणे 16 पैकी 11 समित्यांवर विजय मिळवण्याचा दाखला देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले आहे. भारतीय जनता पक्ष हा अत्यंत मोठा पक्ष आहे, याचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे, असे सांगत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. जगातील 90 टक्के देशांच्या लोकसंख्येपेक्षा भाजपाची सदस्य संख्या ही जास्त असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपाचे सध्या 22 कोटी सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Oct 10, 2020, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.