पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी 18 टन कचऱ्यातून एका महिलेचे दागिने शोधून परत दिले आहेत. ही घटना मोशी येथे घडली असून महिलेने सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या महिलेने सोने आणि चांदीचे दागिने असलेली पर्स घंटा गाडीत नकळत टाकून दिली. त्यात दागिने असल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने मोशी कचरा डेपोशी संपर्क साधून सुनेसाठी बनवलेले पाच ग्रॅम सोने चांदीचे कचऱ्यात गेल्याचं सांगितलं. यानंतर त्यांच्यासमोर सफाई कर्मचारी हेमंत लखन यांनी 18 टन कचऱ्यामधून दागिन्यांची पर्स शोधून परत केली आहे.
पुण्यात 18 टन कचऱ्यातून शोधले सोन्याचे दागिने... नकळत फेकून दिली होती पर्स!
पिंपरी-चिंचवडच्या मोशीत सफाई कर्मचाऱ्यांनी 18 टन कचऱ्यातून एका महिलेचे दागिने शोधून परत दिल्याची घटना समोर आली आहे.