पुणे -लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. बारामती मतदारसंघात मतदान प्रक्रिया पुर्ण झाली असून 61 टक्के मतदान झाले.
बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपच्या कांचन कुल यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीसह भाजपने ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.
- बारामती मतदारसंघात 61 टक्के मतदान - जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
- 6.18 : बारामती मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 55.84 टक्के मतदान झाले
-
३ वाजेपर्यंत ४५.३५ टक्के मतदान झाले आहे.
-
१ वाजेपर्यंत ३५.५८ टक्के मतदान झाले
-
११ वाजेपर्यंत बारामतीत २१.३३ टक्के मतदान झाले आहे.
-
११.२८- माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्नी आणि मुलांसह मतदानाचा हक्क बाजावला. त्यांनी इंदापूर तालुक्यातील बावडा येथे मतदान केले.
-
११- अजित पवार यांचे सुपुत्र आणि मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
-
९ - वाजेपर्यंत ८.५४ टक्के मतदान झाले आहे.
-
८.११ - बारामती लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क. आई प्रतिभा पवार यांच्यासोबत बारामतीच्या रिमांड होम मतदान केंद्रावर केले मतदान
- ७.४४ - काँग्रेस-राष्ट्रवादीने मतभेद विसरून एकोप्याने निवडणूक लढवली त्यामुळे यश निश्चित, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
- ७.२६ - बारामती मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल आणि आमदार राहुल कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क
- ७.२४ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काटेवाडी येथे केले मतदान
- ७.०० - बारामती मतदासंघात मतदानाला सुरूवात