ETV Bharat / state

राज्याच्या प्रगतीच्या आड येणारे सर्व अडथळे दूर करू -मुख्यमंत्री

तरुणांच्या कल्पनांना पंख फुटण्याचे एक वय असते. त्यावेळी अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी या पंखांना बळ देण्याचे काम इनोव्हेशन सेंटरसारख्या संस्थांच्या माध्यमातून व्हावे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते बारामतीमध्ये इन्क्युबेशन, इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 3, 2021, 3:33 AM IST

पुणे (बारामती) - कल्पनांना पंख फुटण्याचे तरुणांचे वय असते. अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी या पंखांना बळ देण्याचे काम इनोव्हेशन सेंटरसारख्या संस्थांच्या माध्यमातून व्हावे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील अटल इन्क्युबेशन सेंटर योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या इन्क्युबेशन, इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते.

बारामतीमध्ये इन्क्युबेशन, इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

'नूतन इन्क्युबेशन केंद्र हे देशातील सर्वोत्तम केंद्र व्हावे'

तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांच्या कल्पनांना पंख फुटले पाहिजेत. या पंखांना गरुडभरारी घेण्याचे बळ आपणा सर्वांना द्यायचे आहे. बारामतीमध्ये उभ्या राहिलेल्या संस्थांच्या माध्यमातून हे काम होत आहे. नूतन इन्क्युबेशन केंद्र हे देशातील सर्वोत्तम केंद्र व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

'राज्याच्या प्रगतीच्या आड येणारे सर्व अडथळे दूर करू'

परदेशात जाऊन तेथील चांगल्या बाबी इकडे आणल्या जाणे महत्त्वाचे असते, असे सांगून आपला महाराष्ट्र सर्व क्षेत्रात देशात अग्रेसर आहेच. पण राज्याला जगातही सर्वोत्तम स्थानावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राज्याच्या प्रगतीच्या आड येणारे सर्व अडथळे दूर करू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, रश्मी ठाकरे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.