ETV Bharat / state

बारामतीत बिबट्याची दहशत; अखेर पुण्याहून मागवला पिंजरा

बारामतीमधील कन्हेरी, काटेवाडी शिवारात नागरिकांना बिबट्या दिसल्याने या परिसरात वन विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी कात्रज येथील सर्च अ‌ँड रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.

baramati leopard news
बारामतीमधील कन्हेरी, काटेवाडी शिवारात नागरिकांना बिबट्या दिसल्याने या परिसरात वन विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे
author img

By

Published : Jan 24, 2020, 10:31 PM IST

पुणे - बारामतीमधील कन्हेरी, काटेवाडी शिवारात नागरिकांना बिबट्या दिसल्याने या परिसरात वन विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी कात्रज येथील सर्च अ‌ँड रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. सबंधित टीमने ढेकळवाडी परिसरात बिबट्यासाठी पिंजरा लावला आहे.

काटेवाडी, कन्हेरी, पिंपळी, वंजारवाडी आणि कारखेल या ठिकाणच्या नागरिकांना बिबट्या दिल्याची चर्चा होती. दोन महिन्यांपूर्वी बारामती एमआयडीसीतील बाऊली इंडिया बेक्स अँड स्वीटस प्रा.ली. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात प्रथम बिबट्याचा वावर आढळला.

baramati leopard news
बारामतीमधील कन्हेरी, काटेवाडी शिवारात नागरिकांना बिबट्या दिसल्याने या परिसरात वन विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे

हेही वाचा- शिरूर येथे जुगार अड्ड्यावर छापा, 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यापूर्वी कांबळेश्वरसह जिरायत भागातील नागरिकांनी देखील बिबट्या असल्याचा दावा केला होता. यानंतर कन्हेरी येथील काळेवाडीत दोन शेळयांरील हल्ला तसेच ढेकळवाडीत एका शेळीवर हल्ला करून ठार मारल्याचे समोर आले. या पथकाने केलेल्या सर्वेक्षणात परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत. या माहितीनुसार बिबट्याचा वावर असल्याला दुजोरा मिळाला आहे.

दरम्यान, यापूर्वी काटेवाडी, कन्हेरी येथील दोन ट्रॅप कॅमेरे निकामी ठरले आहे. आतापर्यंत या कॅमेऱ्यात कोणताही बिबट्या कैद झाला नाही. पथकाने दोन्ही घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुन्हा पिंजरा लावला असून, रहिवास्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे. या सर्च आणि रेस्क्यू पथकात डॉ. नेहा पंचमिया, अभिजीत महाले, जामीद सय्यद यांचा समावेश आहे.

Intro:Body:बारामतीत बिबट्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन-

बारामती- बारामती तालुक्यातील कन्हेरी, काटेवाडी शिवारात नागरिकांना बिबट्या दिसल्याने या परिसरात वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी कात्रज येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. रेस्क्यू टीमने ढेकळवाडी परिसरात बिबट्यासाठी पिंजरा लावला आहे.
      काटेवाडी,  कन्हेरी, पिंपळी, वंजारवाडी आणि कारखेल या ठिकाणच्या नागरिकांना बिबट्या दिल्याची चर्चा होती. मागील दोन महिन्यापूर्वी बारामती एमआयडीसीतील बाऊली इंडिया बेक्स अँड स्वीटस प्रा.ली. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात प्रथम बिबट्याचा वावर आढळून आला होता. यापूर्वी कांबळेश्वरसह जिरायत भागातील नागरिकांनी बिबट्या असल्याचा दावा केला होता. मात्र कन्हेरी येथील काळेवाडीत दोन शेळयांवर केलेला हल्ला. बिबट्याने ढेकळवाडीत एका शेळीवर हल्ला करून ठार मारले आहे. रेस्क्यू पथकाने केलेल्या सर्वेक्षणात परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे, फिरलेला परिसर आणि अन्य माहितीनुसार बिबट्याचा वावर असल्याचा दुजोरा पथकाने दिला आहे. मात्र यापूर्वी काटेवाडी, कन्हेरी आदी ठिकाणी दोन ट्रॅप कॅमेरे निकामी ठरले आहे. आतापर्यंत या कॅमेर्‍यात कोणताही बिबट्या कैद झाला नाही. रेस्क्यू पथकाने दोन्ही घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला असून, रहिवाशांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.
बारामती तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे. यामध्ये डॉ. नेहा पंचमिया, अभिजीत महाले, सातारकर, जामिद सय्य्द यांचा रेस्क्यू पथकात यांचा समावेश
--------

 Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.