ETV Bharat / state

Leopard Attack : तरुणीला दोनशे फूट फरफटत नेणारा बिबट्या अखेर जेरबंद - leopard caught in Cage who dragged young woman

शिरूर तालुक्यातील जांबुत येथे घरासमोर दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका १९ वर्षीय तरुणाचा फरफट नेऊन फडशा पाडला (leopard killed youth in Pune) होता. या घटनेनंतर नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत पिंजरा लावण्याची मागणी केली होती. आणि अखेर आज सकाळी ८ च्या सुमारास तो बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला (leopard caught in Cagein Shirur Taluka Pune) आहे. (Latest news from Pune )

Leopard Attack
Leopard Attack
author img

By

Published : Oct 22, 2022, 1:15 PM IST

पुणे : शिरूर तालुक्यातील जांबुत येथे घरासमोर दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका १९ वर्षीय तरुणाचा फरफट नेऊन फडशा पाडला (leopard killed youth in Pune) होता. या घटनेनंतर नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत पिंजरा लावण्याची मागणी केली होती. आणि अखेर आज सकाळी ८ च्या सुमारास तो बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला (leopard caught in Cagein Shirur Taluka Pune) आहे. (Latest news from Pune )

बिबट्याला पकडण्यात आल्याचा व्हिडिओ

बिबट्याचा तरुणीवर हल्ला- पंधरा दिवसांपूर्वी शिरूर येथील जांबूत परिसरातील जोरीमळा येथे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पूजा ही काही कामासाठी बाहेर आली होती; मात्र जवळच दबा धरून बसलेला बिबट्या तिला दिसला नाही. बिबट्याने तिच्या अंगावर झेप घेत तिच्या गळ्याचा भाग पकडला. त्यानंतर बिबट्याने तिला ऊसाच्या शेतात 200 फुट अंतरावर ओढत नेले. मुलीच्या आईने पाहिले, आरडा-ओरडा केला.

हल्ल्यात तरुणीचा मृत्यू- मदतीसाठी शेजारी राहणाऱ्या व्यक्ती धावूनही आल्या. माणसं येताना पाहतच बिबट्याने तरुणीला सोडून घटनास्थळावरून धूम ठोकली. तिच्या मानेला खोलवर जखम झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. जांबूत येथे हल्ल्याची ही दुसरी दुर्दैवी घटना होती.या घटनेनंतर नागरिकांनी रोष व्यक्त करत पिंजरा लावण्याची मागणी केली होती आणि पिंजरा लावल्यावर तब्बल १५ दिवसांच्या कालावधीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

अखेर बिबट्या जेरबंद - या अगोदर या परिसरात सचिन जोरी या तरुणाचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच अचानक पूजा च्या बाबतीत ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होती. आत्ता हा बिबट्या जेरबंद झाल्याने येथील नागरिकांमधील भीती कमी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.