पुणे- बहुचर्चित एल्गार परिषद आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. या एक दिवसीय एल्गार परिषदेमध्ये देशभरातून विविध वक्ते सहभागी होणार आहे. एकूण सहा सत्र एल्गार परिषदेत होणार आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
३ वर्षापासून परिषदेला परवानगी नाही
३१ डिसेंबर २०१७ ला पहिली एल्गार परिषद पुण्यातील शनिवार वाडा येथे पार पडली होती कोरेगाव-भीमा येथील शौर्य दिनाला दोनशे वर्षे पूर्ण होत असल्याने ही परिषद त्यावेळेस भरवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. धडकन भाषणामुळे हा सर्व हिंसाचार घडल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी एल्गार परिषदेतील व्यक्तींवर कारवाई केली होती. मागील तीन वर्षापासून परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनकडे एल्गार परिषदेसाठी परवानगी मागण्यात आली. मात्र, पोलिसांनी कोरोनाचे कारण देत परवानगी नाकारली होती. त्यानंतर आज म्हणजेच ३० जानेवारीला पोलिसांनी परवानगी दिली आहे.