ETV Bharat / state

Lalit Patil Photos With Girlfriend: ललित पाटील यांचे तुरुंगवास फक्त नावालाच....अशी करायचं मौज मजा; प्रेयसीसोबतचे फोटो व्हायरल - ललित पाटीलचे प्रेयसी सोबतचे फोटो

Lalit Patil Photos With Girlfriend: ड्रग्स माफिया ललित पाटील याला काल (बुधवारी) कर्नाटकातून (Lalit Patil Viral Photos) मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. (Lalit Patil Jail) त्याला पुण्यात आणण्यात आले असून चौकशीत धक्कादायक तत्थ समोर येत आहेत. (Lalit Patil Arrest) ललिल तुरुंगवासात असताना ससून रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, या दरम्यान तो त्याच्या प्रज्ञा कांबळे नावाच्या प्रेयसीबरोबर पंचतारांकित हॉटेलात मौजमजा करायला जायचा. त्याचे प्रेयसीसोबतचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे येरवडा तुरुंग आणि ससून रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 9:20 PM IST

पुणे : Lalit Patil Photos With Girlfriend : मुंबई पोलिसांनी ससून रुग्णालयातून पलायन केलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला काल (बुधवारी) अटक केली. यानंतर पुणे पोलिसांकडून देखील ललित पाटील यांच्या दोन मैत्रिणींना नाशिक येथून अटक केली आहे. या दोघींनीही त्याला पळून जाण्यासाठी मदत केली होती. ललित पाटील यांच्या नंतर त्याच्या प्रेयसीला अटक केल्यावर अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. आता ललित पाटील आणि त्याची प्रेयसी प्रज्ञा कांबळे हीचे काही फोटो समोर आले असून हे फोटो पहिलं असता ललित पाटील याचा तुरुंगवास सुरू होता की, मौज मजा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Lalit Patil News Update)

Lalit Patil
प्रज्ञा कांबळे हिने नवीन कारसोबत काढलेला फोटो

तुरुंगवासाच्या नावाआड आलिशान जीवन : अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक असलेला ललित पाटील हा आजाराच्या कारणाने गेल्या वर्षभरापासून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत होता. या दरम्यान त्याचं राहणीमान हे पंचतारांकित असल्याचं समोर आलं आहे. आता त्याच्या प्रेयसी आणि मैत्रिणीला अटक केल्यावर ललित पाटील आणि त्याच्या प्रेयसीचे काही फोटो हे समोर आले आहेत. या दोघांचे फोटो पाहिले तर ललित पाटील हा उपचार घेत असताना देखील तो त्याच्या प्रेयसी बरोबर मौज मजा करत असताना दिसतोय. तसेच त्याची प्रेयसी ही नाशिक येथील त्याच्या घरी देखील गेली असून तिचा ललित पाटीलच्या आई बरोबर काढलेला फोटो समोर आला आहे.

Lalit Patil
प्रज्ञा कांबळे हिचा मुलासोबतचा फोटो

तुरुंग व रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह : हे फोटो पाहिले असता येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून रुग्णालय प्रशासन यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एखादा कैदी तुरुंगवासात असताना तो उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल होतो. मात्र, तो तेथे न राहता एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रेयसी बरोबर मौज मजा करत असल्याने अनेक प्रश्न हे उपस्थित केले जात आहेत.

lalit Patil
प्रज्ञा कांबळेचा ललितच्या आईसोबतचा फोटो

काळ्या कमाईतून मिळवलेला पैसा मैत्रिणीकडे : ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी त्याची प्रेयसी प्रज्ञा कांबळे आणि तिची मैत्रीण हिने मदत केली आहे. फरार असल्याच्या काळात तो सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता. ड्रग्सच्या काळ्या कमाईतून मिळवलेला पैसा ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याची माहिती आहे.

दरम्यान, हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

हेही वाचा:

  1. Shushma Andhare : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा अनिल जयसिंघानिया केला जाईल का? सुषमा अंधारेंचा सवाल
  2. Lalit Patil Arrest : स्कॉर्पियोने पुणे ते कर्नाटकपर्यंत फिरला ललित पाटील अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात
  3. Devendra Fadnavis On Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले, कोणालाही...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.