पुणे: शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी कोणत्या गँगच्या माध्यमातून दहशत पसरवली जात आहे. पोलिसांकडून कोयता गँगवर कारवाई देखील केली जात आहे. मात्र, असे असताना देखील पुणे शहरातील कोयता गँगची दहशत काही कमी होण्याचे नाव घेत नाही. कोयता गॅंगचा असाच एक गुन्हा समोर आला आहे. पुणे शहरातील भवानी पेठेतील तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? असे म्हणत कोयता गँग कडून हॉटेल निशा रेस्टॉरेन्टची 5 ते 6 जणांकडून तोडफोड (Koyta gang Vandalism on Hotel Nisha Resta) करण्यात आली आहे. याबाबत लष्कर पोलीस पोलीस स्टेशन मध्ये 6 अनोळखी व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.(Koyta Gang Crime)
हॉटेल निशा रेस्टॉरंटवर हल्ल्याचा प्रयत्न: तक्रारदार मोनिष म्हेत्रे हे त्यांच्या कुटुंबासह भवानी पेठेत (Bhawani Pethe in Pune) राहत असून ते राहत असलेल्या बिल्डींगचे तळमजल्यावर त्यांच्या मालकीचे हॉटेल निशा रेस्टॉरेन्ट 388 भवानपिठ प्लॅट नं 105 तळमजला हे खुप जुने आहे. हॉटेल सकाळी 7 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत चालू असते. हॉटेलमध्ये चहा नाष्ठ इत्यादी खाद्य पदार्थाची विक्री केली जाते. काल 5 जानेवारीला नेहमी प्रमाणे आमचे हॉटेल उघडले व ग्राहकांना पदार्थची विक्री कामगार करत होते.
कोयता गॅंगची दहशत संपेल का? तक्रारदार मोनिष म्हेत्रे सांगितले की, दुपारी साडे तीनच्या सुमारास हॉटेलमध्ये गर्दी कमी असल्याने माझ्या हॉटेल मध्ये कामगार संतोष, आझीम हे हॉटेलमध्ये ग्राहक पाहत होतो. मी हॉटेल समोर पार्किंगच्या ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी टू व्हीलर गाडीवरून पाच ते सहा मुले आली त्यांनी तोंडाला रुमाल व डोक्यात टोपी घातलेली होती. त्याचे हातात लोखंडी कोयता, हॉकी व रॉड होते. ते आमचे हॉटेलमध्ये गेले त्यावेळी मी काउंटर दिसलो नाही. म्हणुन ते परत बाहेर आले व मला पाहून त्यातील तीघेजण माझ्या अंगावर पार्किंग मध्ये धावुन आले व त्यानी मला शिवीगाळ करून मला म्हणाले की " तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का ? असे म्हणाले. त्याचे वय अंदाजे 25 ते 26 अंगाने सडपातळ अंगात जीन्स पेन्ट तोडावर रुमाल बांधलेले होते व हॉटेलच्या आतमध्ये दोन ते तीन जणांनी तोडफोड करून नुकसान केली. व सर्वजण तिथुन निघुन जाताना माझ्याकडे रागाने मला पाहुन शिवीगाळ करुन निघुन गेले, असे तक्रारदार मोनिष म्हेत्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान घटनेचा तपास पोलिस करत आहे.