पुणे : पुण्यातील कोथरूड येथे मेफेड्रोन (एम.डी) विक्रीसाठी आलेल्या दोघांना कोथरुड पोलिसांनी महात्मा सोसायटी रोड परिसरातून ताब्यात ( Mephedrone Drug Selling ) घेतले आहे. रवि मोहनसिंग राठोड उर्फ बिल्ला (वय.36,रा. भुगाव मुळशी, मुळ कोटा,राजस्थान), आदित्य संदीप मान (वय.23,रा.बावधन, मुळ.सिडको नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे ( Kothrud police Arrest Two For Drugs Selling ) आहेत. याप्रकरणी दोघांच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थाचे व्यसन : बिल्ला याला अमली पदार्थाचे व्यसन ( Drugs Selling ) आहे. तो शहरात अमली पदार्थाची विक्री करतो. तर आदित्य हा अमली पदार्थांची मुंबई येथून खरेदी करून पुण्यात विक्री करतो. तो दाखविण्यासाठी बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याचे सांगतो. त्यांच्याकडून एक लाख रुपये किंमतीचे सहा ग्रॅम 750 मिली ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, 3 मोबाईल आणि बुलेट असा 1 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सापळा रचून दोघांना अटक : महात्मा सोसायटी रोड परिसरातील एका सोसायटीच्या समोर दोन व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत असे पोलिसांना समजले. त्यानुसार सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता, एमडी हा अमली पदार्थ मिळून आला. त्यांनी तो पुण्यातील तरुणांना विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.