ETV Bharat / state

खेड प्रांतधिकारी व पोलीस निरिक्षक कोरोना पॉझिटिव्ह; कोरोना योद्धाच झाले 'क्वारटांईन' - pune corona updates

सध्या खेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून खेडचे प्रांतधिकारी व राजगुरुनगरचे पोलीस निरिक्षक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अनेक आधिकारी व पत्रकारही त्यांच्या संपर्कात असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांसह पत्रकारांमध्ये खळबळ उडाली आहे. तर, पोलीस निरिक्षक व प्रांतधिकारी यांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असले तरी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे नसल्याचे प्रांतधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

खेड प्रांतधिकारी व पोलीस निरिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

author img

By

Published : Jul 22, 2020, 5:18 PM IST

पुणे : गेल्या चार महिन्यापासून कोरोनाच्या लढाईत यशस्वी काम करणारे अधिकारीच आता कोरोनाचे शिकार व्हायला लागले आहेत. खेडचे प्रांतधिकारी व राजगुरुनगरचे पोलीस निरिक्षक यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, कोरोनाचे रुग्ण खेड तालुक्यात वाढत असतानाच आधिकारीच कोरोनामुळे विलगीकरणात गेल्याने आता नागरिकांना स्वत:च कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन समूह संसर्ग होण्यापासून बचाव करावा लागणार आहे.

राजगुरुनगर चाकण आळंदी व खेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रांतधिकारी यांच्या कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख बैठका पार पडत होत्या. यावेळी सोशल डिस्टसिंगचे नियमांचे पालनही करण्यात आले होते. मात्र, यावेळी अनेक आधिकारी व पत्रकारही संपर्कात असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांसह पत्रकारांमध्ये खळबळ उडाली आहे. तर, पोलीस निरिक्षक व प्रांतधिकारी यांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असले तरी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे नसल्याचे प्रांतधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

कोरोनाच्या महामारीच्या काळात या दोन्ही आधिकाऱ्यांनी अगदी रस्त्यावर येऊन काम केले आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगारांपासून ते पुणे मुंबई परिसरातून येणारे नागरिक अशा प्रत्येक व्यक्तीला शासकीय मदत करण्यापर्यंत सर्व कामे या आधिकाऱ्यांनी पाहिली आहेत. राजगुरुनगर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील 19 पोलीस अधिकाऱ्यांची स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. यातील 19 पोलिसांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लढाईत पोलीस यंत्रणेने मोकळा श्वास घेऊन ते कोरोनाच्या लढाईत पुन्हा सहभागी झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.