ETV Bharat / state

कोण होणार खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा कारभारी? चौरंगी लढतीने येणार रंगत

राज्यात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. यामुळे अनेक इच्छुक मंडळी आपल्यालाच विधानसभेचे तिकिट मिळावे याकरता गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातही हीच परिस्थिती आहे.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 13, 2019, 7:37 PM IST

Updated : Sep 16, 2019, 3:47 PM IST

पुणे - खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ हा राज्यात महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघाला चाकण औद्योगिक हब, भिमाशंकर ज्योतिर्लिंग, वारकऱयांचे श्रद्धास्थान आळंदी आणि क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांचे जन्म गाव राजगुरूनर यामुळे महत्त्व आहे. इतिहासाचा वारसा आणि औद्योगिकरणामुळे बदललेला तालुक्याचा चेहरा, असा दोन्ही अंगानी पूर्णत्व लाभलेला हा मतदारसंघ आहे. मात्र, या मतदारसंघातील राजकारण कधी कुठे वळण घेईल, याचा काही नेम नसतो.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा आढावा

खेड-आळंदी हा मतदारसंघ पुणे-नाशिक महामार्गाच्या दुतर्फा पसरला आहे. भामा-आसखेड, कळमोडी, चासकमान या धरणांच्या माध्यमातून संपूर्ण तालुका सिंचनाखाली आला आहे. भुईकोट, भोरगिरी आणि देव-तोरणे या किल्यांचा ऐतिहासिक वारसा या मतदारसंघाला लाभला आहे. या मतदारसंघातील चाकण औद्योगिक वसाहतीत देशी-विदेशी छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने राज्य-परराज्यातून नोकरदार स्थायिक झाला आहे. निमशहरी भागात शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. याच मतदारसंघात येणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाला वाहतूक कोंडीचा मात्र नेहमी सामना करावा लागतो.

हेही वाचा - आंबेगाव विधानसभा: वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्याला आढळराव पाटील देणार का धक्का?

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जात होता. मात्र, या मतदारसंघात २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना पक्षांतर्गत विरोध वाढत जाऊन परिवर्तनाच्या वाऱ्यात मोहितेंसमोर मोठा विरोधाचा डोंगर उभा राहिला आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले सुरेश गोरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आमदारकी मिळवली. मात्र, तालुक्यात झालेल्या या बदलातून मागील ५ वर्षात भरीव विकास कामे करण्यात विद्यमान आमदार सुरेश गोरे मात्र कमी पडले. यातून तालुक्यातील जनतेचा भ्रमनिरास झाल्याची टिका माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केली आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसवरील नाराजी आणि शिवसेनेतील गटबाजी भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्या मात्र पथ्यावर पडली. तालुक्याची भाजपने बांधणी करत खेड व आळंदी या दोन्ही नगरपरिषदा, दोन जिल्हा परिषद गट, दोन पंचायत समिती गण ,काही ग्रामपंचायती आणि काही ठिकाणच्या विविध कार्यकारी सोसायट्यामध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापटांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात भरघोस विकास कामे भाजपाने राबवली. यात शिवसेनेचे आमदार गोरे मात्र सातत्याने कमी पडतानाच दिसून आले.

२०१८ ला चाकणमध्ये मराठा आंदोलनाची ठिणगी पडली. यात ओबीसी नेतृत्वातून आमदार गोरे खेडचा गड राखत असताना राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण राजगुरुनगर येथील हिंसक मराठा आंदोलनाचे मुख्य सुत्रधार करत गुन्हे दाखल केले गेले. लोकसभेनंतर पुन्हा एकदा या मतदारसंघात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. याच जातीपातीच्या राजकारणाचा फटका लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला बसला होता. यामुळे सध्यपरस्थीतीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपच्या सुरू असलेल्या चढाओढीच्या राजकारणाचा फायदा भाजपला होण्याची चिन्ह पहायला मिळत आहे.

हेही वाचा - आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?

या मतदारसंघात उभी राहिलेली उद्योगनगरी व वाढते शहरीकरण यामुळे येथे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यात शिवसेना कमी पडली आहे. असे असताना पूर्वाश्रमीचे शिवसेनेत असलेले आता राष्टवादीचा घरोबा केलेले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठे संघटन एकवटले. हे पाहून शिवसेनेत पक्षांतर्गत बदलाकडे लक्ष केंद्रित करून आमदार गोरेंना विरोध ठरणारे रामदास ठाकुर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात शिवसेना यशस्वी ठरली.

शिवसेनेत पक्षांतर गटबाजी सुरू असतानाही भाजप-शिवसेना युती होऊन आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर या निवडणुकीत विजय मिळणार असल्याचे विद्यमान आमदार सुरेश गोरे ठामपणे सांगत आहेत.

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात या मतदारसंघातील समस्या आजही कायम आहेत. तर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात तरुणांचा मोठा प्रभाव असल्याचेही दिसत असून तरुणांचे आकर्षण असणारा उमेदवार या मतदारसंघात आपला विजयाचा गड राखणार असच चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - संगमनेर विधानसभा आढावा: विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?

2014 च्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदान आणि नुकत्याच झालेल्या 2019 च्या शिरूर लोकसभेतील खेड-आळंदी विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मते

१) 2019 : शिरूर लोकसभेत खेड-आळंदी विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मते

शिवाजीराव आढळराव (शिवसेना) - 92,138

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 99,583 (विजयी)

२) 2014:खेड-आळंदी विधानसभा मतदान

सुरेश गोरे, शिवसेना- 1,03,207 विजयी

दिलीप मोहिते, राष्ट्रवादी- 70,489

2019 च्या खेड-आळंदी विधानसभेत इच्छुक आणि संभाव्य उमेदवार

१) अतुल देशमुख - भाजप
)सुरेश गोरे - शिवसेना
३)दिलीप मोहिते- राष्ट्रवादी.
४)रामदास ठाकुर- अपक्ष

Intro:Anc__खेड-आळंदी विधानसभा मतदार संघ हा राज्यात महत्वाचा मतदार संघ मानला जातो तो चाकण औद्योगिक हब, आणि बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर,वारक-़यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी आणि देशासाठी फासावर चढलेल्या क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांचे जन्म गाव असलेल्या राजगुरूनरमुळे. इतिहासाचा वारसा आणि औद्योगिकरणामुळे बदललेला तालुक्याचा चेहरा असा दोन्ही अंगानी पूर्णत्व लाभलेला हा मतदारसंघ आहे ...मात्र या मतदार संघातील राजकारण कधी कुठं वळण घेईल याचा काही नेम नसतो...

खेड-आळंदी हा मतदारसंघ पुणे-नाशिक महामार्गाच्या दुतर्फा पसरला आहे.भामा-आसखेड,कळमोडी, चासकमान या धरणांच्या माध्यमातुन संपूर्ण तालुका सिंचनाखाली आला आहे. भुईकोट, भोरगिरी आणि देव-तोरणे या किल्यांचा ऐतिहासिक वारसा या मतदारसंघाला लाभला आहे. या मतदार संघातील चाकण औद्योगिक वसाहतीत देशी-विदेशी छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने राज्य-परराज्यातून मोठ्या संख्येने नोकरदार स्थायिक झाला आहे. निमशहरी भागात शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. याच मतदारसंघात येणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाला वाहतूक कोंडीचा मात्र नेहमी सामना करावा लागतो.

खेड आळंदी विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जात होता.मात्र या मतदार संघात २०१४ साली राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहितेंना पक्षांतर्गत विरोध वाढत जाऊन परिवर्तनाच्या वाऱ्यात मोहितेंसमोर मोठा विरोधाचा डोंगर उभा राहिला आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले सुरेश गोरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आमदारकी मिळवली.मात्र तालुक्यात झालेल्या या बदलातुन मागील ५ वर्षात भरीव विकास कामे करण्यात विद्यमान आमदार सुरेश गोरे मात्र कमी पडले.यातून तालुक्यातील जनतेचा भ्रमनिस झाल्याची टिका माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केलीय.

Byte__दिलीप मोहिते__माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी कॉग्रेसवरील नाराजी आणि शिवसेनेतील गटबाजीत या मतदार संघात भाजपाचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्या मात्र पथ्यावर पडली. तालुक्याची भाजपाने बांधणी करत खेड व आळंदी या दोनी नगरपरिषदा, दोन जिल्हा परिषद गट,दोन पंचायत समिती गण ,काही ग्रामपंचायती,आणि काही ठिकाणच्या विविध कार्यकारी सोसायट्यामध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापटांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण तालुक्यात भरघोस विकास कामे भाजपाने राबवली यात शिवसेनेचे आमदार गोरे मात्र सातत्याने कमी पडतानाच दिसून आले.

Byte__अतुल देशमुख _भाजपा

२०१८ ला चाकण मध्ये मराठा आंदोलनाची ठिणगी पडली यात ओबीसी नेतृत्वातुन आमदार गोरे खेडचा गड राखत असताना राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण राजगुरुनगर येथील मराठा आंदोलन झालेल्या हिंसक आंदोलनाचे मुख्य सुत्रधार करत गुन्हे दाखल केले गेले. लोकसभेनंतर पुन्हा एकदा या मतदार संघात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. याच जातीपातीच्या राजकारणाचा फटका लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला बसला होता यामुळे सध्यपरस्थीतीत राष्ट्रवादी,शिवसेना आणि भाजपच्या सुरु असले्ल़ा चढाओढीच्या राजकारणाचा फायदा भाजपा होण्याची चिन्ह पहायला मिळत आहे.

Byte__कोडिंभाऊ पाचार्णे _राजकिय विश्लेषक

या मतदार संघात उभी राहिलेली उद्योगनगरी व वाढतं शहरीकरण यामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन अनेक समस्या आहेत या समस्या शिवसेना सोडविण्यात कमी पडली असताना पूर्वाश्रमीचे शिवसेनेत असलेले आता राष्टवादीचा घरोबा केलेले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठं संघटन एकवटत असल्याचं पाहून शिवसेनेत पक्षांतर्गत बदलाकडे लक्ष केंद्रित करुन आमदार गोरेंना विरोध ठरणारे रामदास ठाकुर यांना पक्षातुन हकालपट्टी करण्यात शिवसेना यशस्वी ठरली..

Byte__रामदास ठाकुर__माजी शिवसैनिक.

शिवसेनेत पक्षांतर गटबाजी सुरु असतानाही विद्यमान आमदार भाजपा-शिवसेना युती होऊन आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर या निवडणुकीत विजय मिळणार असल्याचे आमदार सुरेश गोरे ठामपणे सांगत आहेत.

Byte__सुरेश गोरे __आमदार शिवसेना

खेड आळंदी विधानसभा मतदार संघावर शिवसेना, भाजपा,राष्ट्रवादी कॉग्रेस हे तीनही पक्ष आपल्या विजयाचा दावा करतात मात्र प्रत्यक्षात या मतदार संघातील समस्या आजही कायम आहेत..तर लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात तरुणांचा मोठा प्रभाव असल्याचेहि दिसत असुन तरुणांचे आकर्षण असणारा उमेदवार या मतदार संघात आपला विजयाचा गड राखणार असच चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.

Ptc__रोहिदास गाडगे__प्रतिनिधी.

ग्राफिक्स......
__________________________________
2014 च्या खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील मतदान आणि नुकत्याच झालेल्या 2019 च्या शिरूर लोकसभेतील खेड-आळंदी विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मते आणि यावर एक नजर टाकुयात....

१) 2019: शिरूर लोकसभेत खेड-आळंदी विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मते

शिवाजीराव आढळराव (शिवसेना) - 92,138
डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 99,583 (विजयी)
_______________________________________
२) 2014:खेड-आळंदी विधानसभा मतदान...
सुरेश गोरे, शिवसेना- 1,03,207 विजयी
दिलीप मोहिते, राष्ट्रवादी- 70,489
_______________________________________
2019च्या खेड-आळंदी विधानसभेत इच्छुक आणि संभाव्य उमेदवार यावर एक नजर टाकूया

१)अतुल देशमुख__भाजप
२)सुरेश गोरे__शिवसेना
३) दिलीप मोहिते__राष्ट्रवादी.
४)रामदास ठाकुर__अपक्ष
---------------------------------------------------Body:Feed FTP...

mh_pun_2_khed-alandi vidhansabha_spl vis_mh10013

Total file_24

Spl pkg..विधानसभाConclusion:
Last Updated : Sep 16, 2019, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.