ETV Bharat / state

Kesarkar On ShivSena BJP Alliance : महाविकास आघाडी सरकार असताना पुन्हा युती होणार होती - दीपक केसरकरांचा दावा

Kesarkar On ShivSena BJP Alliance : 8 जून 2021 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे हे मविआमध्ये मुख्यमंत्री असतानाही ते भाजपासोबत युती करणार होते. याविषयी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज दावा केला आहे. या दाव्याची शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पुष्टी केली आहे. वाचा काय आहे प्रकरण...

Kesarkar On ShivSena BJP Alliance
मंत्री दीपक केसरकरांचा दावा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 4:45 PM IST

शिवसेना भाजपाच्या युतीविषयी बोलताना मंत्री दीपक केसरकर

पुणे Kesarkar On ShivSena BJP Alliance : महाविकास आघाडीचं (Uddhav Thackeray and Modi meet) सरकार असताना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे दिल्लीला गेले होते. तेव्हा उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात युतीबाबत बोलणं झालं होतं आणि ही गोष्ट संजय राऊत यांनीच शरद पवार तसंच अजित पवार यांना जाऊन सांगितली. मग खलनायक कोण होतं तुम्हीच शोधा असं यावेळी केसरकर म्हणाले. ते आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सर्किट हाऊस येथे विविध विषयांवर भाष्य केलं आहे. (ShivSena BJP alliance)

मविआच्या काळात भाजपा-सेना युतीविषयी चर्चा : यावेळी मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची दिल्लीत युती बाबत चर्चा झाली आणि महाराष्ट्रात जाऊन युती करतो असं ठरवून आले तेव्हा संजय राऊत यांनीच अजित पवार आणि शरद पवार यांना ही बातमी कळवली. हे शंभर टक्के खरं आहे; कारण मी यांच्यात मध्यस्थी केली होती. महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा-सेना युतीबाबत चर्चा झाली होती आणि 15 दिवसांच्या आत युती पुनर्स्थापित होणार होती. पण कोण खलनायक आहे हे आम्हाला कळलं नाही. आता तटकरे बोलले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यामुळे युती झाली नसेल तर यात त्यांचा खूप मोठा रोल आहे, असं यावेळी केसरकर म्हणाले.

शाळांचं खासगीकरण होणार नाही : शाळा खासगीकरणाबाबत केसरकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, शाळांचं खासगीकरण होणार नाही. शिक्षक लाखोनं पगार घेत आहेत. शाळांची स्थिती बिकट आहे. त्या दुरुस्तीसाठी कंपन्या पुढे आल्या तर काय झालं. ते पैसे एनजीओकडे जातात. एनजीओ मुलांसाठी एवढं काही काम करतात असं नाही. शिक्षक संघटनांची मिटिंग घेऊन त्यांना शिकवायचं आहे, हे मी सांगणार आहे. शिक्षणबाबत आरोप करणारे नेते आणि संघटना यांचं मेतकूट असल्याचं यावेळी केसरकर म्हणाले.

एकही शाळा बंद होणार नाही : समूह शाळांबाबत दीपक केसरकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, एकही शाळा बंद करण्याची ऑर्डर नाही. समूह शाळेत जायचं असेल तर शहरात सोय होते. त्यामुळे शाळा बंद अजिबात केल्या जाणार नाहीत. ग्रामीण भागात देखील विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसंच पवित्र पोर्टल ओपन होत आहे. शिक्षक भरती, बदल्या सगळे चॉईस दिले आहेत. 30 हजार शिक्षक भरती पूर्ण होणार आहे. ती थांबवायची तयारी नाही. स्टे आल्यामुळे थोडा उशीर झाला आहे, असं यावेळी केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं : उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्षाबरोबर युती केली आहे. यावर केसरकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानवर बोलायचा अधिकार नाही. हिंदुत्वावर बोलायचा अधिकार त्यांना आहे का? त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे. ते स्टॅलिनलला घाबरले आहेत. त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका करणं सोडायला पाहिजे, असं यावेळी केसरकर म्हणाले.

हेही वाचा:

  1. Gulabrao Patil On Girish Mahajan : 'मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार', गुलाबराव पाटलांची जोरदार टोलेबाजी
  2. Rahul Narvekar on MLAs disqualification : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कोणता निर्णय घेणार? राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट सांगितलं...
  3. Uddhav Thackeray : समाजवादी परिवार अन् शिवसेना एकत्र; उद्धव ठाकरेंचा भाजपासह 'आरएसएस'वर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.