ETV Bharat / state

Kasba bypoll: कसब्यात बंडखोरी संपली, शिवसेनेत नाराजी वाढली, कसब्यात महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं - l Vishal Dhanawade

कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आणि प्रचार जोरात चालू असताना महाविकास आघाडी मधल्या अंतर्गत राजकारणाचा फटका मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. यामध्ये बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला यश आले. परंतु आपापल्या पक्षांमधील अंतर्गत नाराजीचा फटका मात्र या विधानसभेत महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. पुण्यात शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. चिंचवडमध्ये बंडखोरी तर कसब्यात मोठा पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.

kasba shivsena
कसब्यात बंडखोरी संपली
author img

By

Published : Feb 10, 2023, 1:26 PM IST

पुणे: कसबामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मतदार संघात सरळ लढाई होत आहे. असे असले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील ही जागा लढवण्यासाठी इच्छुक होते. शिवसेनेकडून शहराध्यक्ष संजय मोरे तसेच विशाल धनवडे हे इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर शिवसेनेत मोठे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.

धनवडे राजीनाम्याच्या तयारीत: पक्षात प्रोटोकॉल पाळले जात नाहीत. असा आरोप करत कसबा विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्ररक्षक असलेले विशाल धनवडे यांनी आपली नाराजी प्रगट केली आहे. विशाल धनवडे यांचे थेट शहराध्यक्षांसोबतच वाद झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. हा वाद इतका टोकाला गेला आहे की विशाल धनवडे हे आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आज शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर पुणे दौऱ्यावर आहेत. विशाल धनवडे हे आज संध्याकाळी 8 वाजता सचिन अहिर यांची भेट घेऊन पक्षांतर्गत राजकारणाची माहिती सचिन अहिर यांना देणार आहेत. उद्या संध्याकाळी आठ वाजता ही भेट होणार असून त्यानंतर विशाल धनवडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेनेमधील एक मोठा चेहरा: विशाल धनवडे हे शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. विशाल धनवडे यांना या निवडणुकीत 13 हजार 989 इतकी मते मिळाली होती. विशाल धनवडे हे पुणे शिवसेनेमधील एक मोठा चेहरा असून पुण्यातील शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांनाच साथ देण्याचा निर्णय घेतला होता. धनवडे यांची कसबा विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यामुळे ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर धनवडे यांची नाराजी महाविकास आघाडीला महागात पडू शकते. त्यामुळे आज सचिन अहिर यांच्या भेटीनंतर धनवडे काय निर्णय घेणार यावर कसब्याच्या पोटनिवडणुकीचे अनेक गणित अवलंबून असणार आहेत.

अंतर्गत विरोध संपवणे महत्त्वाचे: कसबा विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला बंडखोर उमेदवारांना माघार घ्यायला लावले. त्यामुळे हा विजय सोपा होईल असे वाटते. तीन पक्षांमधील एक प्रमुख पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे अंतर्गत राजकारणामुळे या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशाल धनवडे प्रामुख्याने कसबा पेठ भागातले नगरसेवक आहेत .त्यामुळे त्यांचे त्या भागात मोठे प्रस्थ आहे. त्याचा फटका हा विकास आघाडीच्या उमेदवाराला बसू नये हा प्रयत्न आता उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षाचे नेते सचिन अहिर हे करतील का हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र महाविकास आघाडी समोरील संकट संपताना दिसत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडीला पूर्ण ताकतीने लढण्यासाठी आधी अंतर्गत विरोध संपवणे महत्त्वाचा आहे.

हेही वाचा: Sudhir Mungantiwar दाढी वाढवल्याने कोण प्रधानमंत्री होत नाही तर त्याला बुद्धी वाढवावी लागते सुधीर मुनगंटीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.