ETV Bharat / state

Pune Crime: पुण्यातील कसबा निवडणुकीत पैशाचा खेळ? चारचाकी वाहनातून पाच लाखांची रोकड जप्त

कसबा आणि चिंचवडमध्ये येत्या २६ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अश्यातच पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी एका चारचाकी वाहन धारकाकडून पाच लाखांची रोकड पकडली आहे. निवडणूक अधिकारी आणि स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.

Pune Crime
रोख रक्कम जप्त
author img

By

Published : Feb 16, 2023, 7:15 PM IST

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार तसेच आरोप प्रत्यारोप होत आहे. अशातच या चारचाकी गाडीत सापडलेल्या 4 लाख रुपये रोख रकमेची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

मतदारांना वाटण्यासाठी : ज्या गाडीत ही रक्कम आढळून आली आहे, त्या गाडी चालकाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मात्र, चालकाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने निवडणुकीसाठीच ही रोकड आणली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही रक्कम वाटण्यासाठी आणली असल्यास यातील काही रक्कम वाटण्यात आली आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. ऐन मतदानापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

प्रत्येक चौकात चेक पोस्ट : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून प्रत्येक चौकात चेक पोस्ट करण्यात आलेले आहे आणि पोलिसांना एखाद्यावर संशय आल्यास त्याची चौकशी देखील केली जात आहे. त्या माध्यमातून चौकशी केली असता त्याच्याकडे पाच लाख रुपये आढळून आले आहेत. त्याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली.

आमदारांना जबाबदारी : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मतदार संघात पोट निवडणूक 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या पोट निवडणुकीत प्रत्येक आमदाराला खास जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक आमदाराला प्रचारासाठी विभागवार जबाबदारी या बैठकीतून देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ हा पुण्यातील शहरी भागातला मतदारसंघ आहे.

शिबिरातून दाखवली ताकद : प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील आमदारांचा वर्गीकरण करण्यात आले आहे. या मतदारसंघात त्यांच्या जिल्ह्यात आणि तालुक्यातील असलेल्या मतदारांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आपला संपर्क ठेवायचा आहे. यासाठी प्रत्येक आमदाराला वेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच प्रचार करताना या प्रत्येक आमदारांना त्यांच्या तालुका आणि जिल्ह्यातील नागरिकांकडे प्रचार करण्याची विशेष जबाबदारी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत या दोन्हीही जागा जिंकून आणण्यासाठी या शिबिरातून राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकत लावली आहे.

आमदारांना सूचना : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या केवळ पोट निवडणुकांपुरते मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी पुढील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या शिबिरातून सर्व आमदारांना केल्या आहेत. प्रत्येक आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी रणशिंग फुंकली आहेत.

हेही वाचा: IIT Student Suicide Case : दर्शन सोळंकीच्या मृत्यूला जातीभेदाची वागणूक कारणीभूत; कुटुंबियांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.