ETV Bharat / state

खडकीत तोतया आर्मी अधिकारी ताब्यात; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - पुणे ग्रामीण पोलीस

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सैन्यात मेजर असल्याची बतावणी करणाऱ्या प्रशांत काळे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

police seized things from kale
प्रशांत काळे कडून जप्त केलेला मुद्देमाल
author img

By

Published : Jun 11, 2020, 1:19 PM IST

दौंड(पुणे)- दौंड तालुक्यातील खडकी या गावात तोतया आर्मी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी ताब्यात घेतले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत याबाबत माहिती मिळाली होती.

दौंड तालुक्यातील खडकी गावातील प्रशांत विजय काळे हा व्यक्ती भारतीय लष्करात कोणत्याही पदावर नेमणुकीस नसतानाही तो भारतीय लष्करात १४ सिख रेजिमेंटचा मेजर असल्याची बतावणी करत होता. ही माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाल्याने त्याबाबत खातरजमा करण्याकरीता पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वात खडकीला पाठवले होते.

Fake army officer arrested in daund khadaki
तोतया आर्मी अधिकारी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खडकी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ सापळा लावून इंडियन आर्मी लोगो असलेला खाकी रंगाचा टी शर्ट घातलेल्या प्रशांत विजय काळे, उर्फ रोबोस्ट आण्णा (वय२७, रा. खडकी) याला ताब्यात घेतले.काळे याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या मित्रांजवळ लोकसेवक असल्याची बतावणी केल्याचे स्पष्ट झाले.

भारतीय सेना दलाची विविध पदके, चिन्हे, सेनादलातील नियुक्तीचे पत्र, सेना दलात विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर दिली जाणारी पदके, सन्मानचिन्ह, लोगो, भारतीय सेना दलाची कपडे, मोबाईल फोन असा ९ हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल काळे याच्या घरातून जप्त करण्यात आला. काळे विरोधात दौंड पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ४१९, १७०, ४६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दौंडचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात स.पो.नि.दत्तात्रय गुंड, पोलीस हवालदार रौफ इनामदार, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, निलेष कदम, महेष गायकवाड, रविराज कोकरे, अनिल काळे, पोलीस नाईक गुरूनाथ गायकवाड, सुभाष राऊत, चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जावळे यांचा समावेश होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.