ETV Bharat / state

भावाने लाथ घातल्याने दुसरे घर शोधण्याची पाळी; काकडेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - पवार

भाजपशी काडीमोड करुन राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा काकडेंचा प्रयत्न

संजय काकडे
author img

By

Published : Feb 11, 2019, 11:13 PM IST

पुणे - भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी काकडेंनी अजित पवारांवर स्तुतीसुमनेही उधळली. मुख्यमंत्री माझ्या भावासारखे आहेत. पण भावाने लाथ घातल्याने दुसरे घर शोधण्याची पाळी आली, असे वक्तव्य काकडेंनी केले. त्यामुळे काकडे राष्ट्रवादीशी घरोबा करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संजय काकडे
काकडे म्हणाले, की मध्यंतरी मी भ्रमिष्ट झालो होतो. भाजपने माझा वापर करुन घेतला. पुण्यात अजित पवारांचे मोठे वजन आहे. राष्ट्रवादीचे मोठे मतदाने आहे. म्हणून त्यांना भेटायला आलो, असे काकडे म्हणाले. काकडेंच्या या वक्तव्यामुळे ते राष्ट्रवादीशी सलगी करु पाहत असल्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत.
undefined

अजित पवारांनी मात्र या प्रकरणी सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, की ही जागा काँग्रेसला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी त्याचा उमेदवाराचा प्रचार करेल. अपक्ष निवडणून येणे सोपे नाही, असे मी संजय काकडेंना सांगितले.

दरम्यान, संजय काकडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काकडेंनी उमेदवारीसाठी काँग्रेसकडेही चाचपणी केली होती. मात्र, काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, काकडे उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होतात का हे येणाऱ्या काळात दिसेलच.

Intro:r mh pune 03 11feb19 ajit pawar kakde meet r waghBody:r mh pune 03 11feb19 ajit pawar kakde meet r wagh

Anchor
बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त शैलीमुळे प्रसिद्ध असलेले पुण्यातील
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन अजित पवारांचे गुणगान गात खळबळ उडवून दिलीय....मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असलेल्या संजय काकडे यांनी आता आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवत मुख्यमंत्री माझ्या
भावा सारखे मात्र भावाने मला लाथ घातल्याने आता दुसरे घर शोधण्याची पाळी आली अशी प्रतिक्रिया दिलीय
मध्यंतरी मी भ्रमिष्ट झालो होतो
पण भाजप ने माझा वापर केला असा आरोप ही काकडे यांनी केला आहे, भाजप कडून भ्रम निरास झालेले संजय काकडे लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा मिळवू पाहत आहेत, या भेटीनंतर काकडे यांनी अजित पवारांचे गुणगान गायले, राष्ट्रवादीच पुण्यात मोठं मतदान आहे त्यामुळे अजितदादा ना भेटायला आलो, पुण्यात दादांचे मोठं वजन आहे असे काकडे म्हणाले दरम्यान या भेटी बाबत अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलीय, पुण्याची जागा काँग्रेसच्या वाटेला जाईल त्यामुळे मी संजय ला सांगितलं काँग्रेस जो उमेदवार देणार त्याच काम करणार...अपक्ष निवडून येणं लोकसभेला सोपं नाही हे ही सांगितलं असल्याचे अजित पवार म्हणाले.....आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप कडून पुणे लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी संजय काकडे यांनी जंगजंग पछाडले मात्र भाजप कडून डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी काँग्रेस कडे आपला मोर्चा वळवला होता संजय काकडे यांनी मध्यंतरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची देखील भेट घेतली होती मात्र काँग्रेस बाबत नक्की काय होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे, स्थानिक काँग्रेसजनांचा संजय काकडे यांच्या नावाला तीव्र विरोध आहे त्यात काँग्रेस कडून वेगळेच नाव समोर करून धक्कातंत्र खेळलं जाऊ शकत ही बाब लक्षात आल्यावर आता संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळले आहेत, मागच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची देखील संजय काकडे यांनी भेट घेतली होती आणि सोमवारी अजित पवारांची भेट घेत काकडेंनी आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत, पुणे लोकसभेची जागा आघााडीत
काँग्रेसकडे आहे त्यामुळे अपक्ष उभे राहून राष्ट्रवादीचा पाठींबा घेण्याचे काकडे याचे प्रयत्न असल्याचे या भेटीतून समोर येते आहे...…..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.