पुणे : सध्या सर्वत्र दिवाळीचा धुमाकूळ असून नागरिक दिवाळीसाठी लागणारे कपडे, विविध वस्तू, फटाके, आकाशकंदील, तसेच मिठाई खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. दिवाळीत मोठ्या प्रमाणावर मिठाई ही खरेदी केली ( Diwali sweets expensive ) जाते. यंदा पुण्यातील काका हलवाई मिठाई वाले ( Pune Kaka Halwai Mithai Wale ) यांनी यंदाच्या दिवाळीत सोन्याची काजू कतली बनविली असून या काजू कतलीची चर्चा ही सध्या सर्वत्र होत आहे.
सोन्याची मिठाई : दिवाळी अगदी दोन दिवसांवर आली असून महागडे फटाके वाजवून पैसे वाया घालवीण्यापेक्षा महागडी मिठाई खाऊन आपला दिवाळी सण गोड करण्याकडे नागरिकांचा कल सध्या ( citizens tendency to eat sweets ) दिसत आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध काका हलवाई यांच्या मार्फत दरवर्षी सोन्याची मिठाई बनविण्यात येते. यंदा २४ कॅरेट सोन्याचा वरख लावलेली काजू कतली ( Golden Kaju katli ) ही मिठाई बाजारात आणली आहे. एका ग्राहकाच्या ऑडरनुसार 4 किलो सोन्याची काजू कतली बनविण्यात आली असून याची किंमत ही 40 हजार आहे. तसेच ही मिठाई विशिष्ठ अश्या डब्यात ती पॅक करून देण्यात येणार आहे.
कोरोनात सर्वांत मोठा फटका : गेली दोन वर्ष कोरोनाने सर्वांनाच मोठा फटका बसला आहे.पण यंदा निर्बंधमुक्त सण उत्सव साजरे होत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक हे मिठाई खरेदी करत असून यंदा महागाईचा फटका मिठाईवर बसला असला तरी ग्राहक हे यंदा मोठ्या संख्येने येत असून यंदाची दिवाळी ही गोड होत असल्याचे यावेळी युवराज गाडवे यांनी सांगितले .