पुणे - पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर देखील आठवड्याभरात फुल्ल झाला आहे. एकूण 652 बेडची क्षमता असलेल्या या जम्बो कोविड केअर सेंटर मध्ये 500 ऑक्सीजन बेड, 100 आयसीयू आणि 52 व्हेंटिलेटर बेड्स आहे. पुण्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णाने पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर हा आत्ताच्या घडीला पूर्णपणे फुल्ल झाले आहे. सरकारी रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरली असून खासगी रुग्णालयांमध्ये देखील बेड उपलब्ध होत नाही.
23 मार्चपासून पुन्हा सुरू झाले जम्बो कोविड सेंटर
शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. जानेवारीपासून संख्या कमी झाल्याने हे सेंटर बंद करण्यात आळे होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. एकेका दिवसांमध्ये चार हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यात आत्ता रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने 23 मार्चला पुन्हा हे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते.
अजून बेड्स वाढवण्यात येणार
ससून रुग्णालय आणि महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय कोरोना बधितांनी भरले आहे. तेथेही उपचारासाठी दाखल होणाऱ्या नवीन रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे ही रूग्णालय प्रशासनासमोरील मोठी डोकेदुखी ठरत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ही बेड उपलब्ध नाहीत तसेच तेथील उपचाराचा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने आत्ता जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. मात्र, आत्ताही जम्बो कोविड केअर देखील फुल्ल झाल्याने कोरोनाग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या माध्यमातून अजून काही बेड्स वाढविण्यात येणार असून याबाबत आज (दि. 15 एप्रिल) निर्णय होणार आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र मुठे यांनी दिली.
हेही वाचा - अद्याप शिवभोजन थाळी मोफत नाहीच
हेही वाचा - पुण्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना पाच जणांना अटक, 4 इंजेक्शन जप्त