पुणे - राज्य सरकारने जिम सुरू करण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. लवकरात लवकर जिम सुरू कराव्यात या मागणीसाठी आज पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने राज्य सरकारला गायडन्स दिलेला असतानाही राज्य सरकार जिम सुरू करण्याबाबत टाळाटाळ करत आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही सरकारच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु आज जिम मालक, ट्रेनर असतील यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना आज उपासमारीची वेळ आली आहे. कित्येक ठिकाणी ट्रेनरनी आत्महत्या केल्या आहे. याला जबाबदार कोण. असा सवाल जिम व्यावसायिक कृष्णा भंडलकर यांनी राज्य सरकारला केलाय.
विविध मागण्यांसाठी हे आंदोलन जिम व्यावसायिकांकडून करण्यात आले आहे. सरकारने ओपन जिमला परवानगी मात्र बंदिस्त जिमला का नाही ? ओपन जिममध्ये कुठलीही काळजी घेतली जात नाहीये तरीही त्याला परवानगी दिली आहे. मात्र जिमसाठी सरकार टाळाटाळ करत आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर जिम सुरु करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीये.
व्यायाम कराल तरच फिट इंडिया असेल, सेवा जिम, ओपन जिम चालू तर इंडोर का नाही अशा आशयाचे फलक यावेळी आंदोलकांनी हातात घेत आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले.