ETV Bharat / state

नगर-कल्याण महामार्गावर जीपच्या धडकेत कारने घेतला पेट.. तीन जण जखमी - पुणे अपघात बातमी

कैलास नमाजी शिंदे हे कुटुंबासह बेल्हे वरुन पुण्याला जात होते. दरम्यान, नगर-कल्याण बेल्हे गुंजाळवाडी येथे समोरुन येणाऱ्या जीपची शिंदे यांच्या कारला जोरदार धडक बसली. या घटनेत कारने पेट घेतला.

jeep-car-accident-on-nagar-kalyan-road-junnar-pune
नगर-कल्याण महामार्गावर जीपच्या धडकेत कारने घेतला पेट.
author img

By

Published : Jun 17, 2020, 12:30 AM IST

जुन्नर (पुणे)- नगर-कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी फाट्याजवळ जीप व कारची समोरासमोर जोरदार धडक बसली आहे. या अपघातात कारने अचानक पेट घेतल्याने, कारमधील दोन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कैलास शिंदे, रोहिणी शिंदे, गंगूबाई शिंदे अशी जखमींची नावे आहेत.

नगर-कल्याण महामार्गावर जीपच्या धडकेत कारने घेतला पेट.

कैलास नमाजी शिंदे हे कुटुंबासह बेल्हेवरुन पुण्याला जात होते. दरम्यान, नगर-कल्याण बेल्हे गुंजाळवाडी येथे समोरुन येणाऱ्या जीपची शिंदे यांच्या कारला जोरदार धडक बसली. या घटनेत कारने पेट घेतला. कारमधील शिंदे कुटुंबाला लवकर कारबाहेर पडता न आल्याने यात तीन जण भाजल्याने जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने आळेफाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेत कार पुर्णत: जळून खाक झाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरातच असल्याने रस्त्यावरील अपघातात घट झाली होती. मात्र, लॉकडाऊनमधील काही नियमांवर शिथिलता दिल्याने नागरिकांचा प्रवास सुरू झाला असल्याने पुन्हा अपघातांची मालिका सुरू झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.