ETV Bharat / state

Jayant Patil On Ajit Pawar: अजित पवारांबाबत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं समाधान, म्हणाले...

Jayant Patil On Ajit Pawar : आज पुण्यात माध्यमांसोबत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केलीय. ते बोलताना म्हणाले की, बारामती आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार ठरले आहेत. अजित पवार सावध आहेत, याचं मला समाधान आहे.

Jayant Patil On Ajit Pawar
जयंत पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 9:42 PM IST

जयंत पाटील यांचा माध्यमांशी संवाद

पुणे Jayant Patil On Ajit Pawar : बारामतीमध्ये अर्थमंत्री पद राहील का नाही माहित नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार सावध आहेत, याचं मला समाधान आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केलीय. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाला आमदार निधी दिला जात नाही, अशी तक्रार नेहमी होत असते. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, काही आमदार मला म्हणाले आमचा निधी रोखला जातोय. यापुढं असं होऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेतोय. निधी देण्याबाबतच्या अडचणी सरकार दूर करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

विधानसभेचे उमेदवार ठरले : भाजपाकडून लोकसभेच्या उमेदवारांचं नाव निश्चित केलं गेलं असल्याचे म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही चर्चा आहे का, यावर बोलताना ते म्हणाले की, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे पवार आणि अमोल कोल्हे हे आमचे उमेदवार आहेत. बाकी उमेदवारांची चर्चा इतर पक्षाशी करून इंडिया आघाडी ठरवेल. आमचीही काही नावं ठरलेली आहेत. एकनाथ खडसेंना आम्ही जळगावमध्ये जबाबदारी देणार आहोत, सुप्रिया सुळे बारामतीच्या उमेदवार आहेत. साताऱ्याचेही उमेदवार लवकरच ठरतील. आम्ही अगदी विधानसभेपर्यंत पोहोचलो आहोत. त्याही निवडणुकीचे आमचे उमेदवार ठरले आहेत, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलीय.

शरद पवार अदानी भेट : शरद पवार आणि गौतम अदानी यांची गुजरातमध्ये एका कारखान्याच्या उद्घाटनावेळी भेट झाली. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, गौतम अदानी यांनी नवं उद्योग सुरू करत आहेत. त्यामुळं त्यांनी शरद पवारांना आमंत्रण दिलं होतं. म्हणून शरद पवार तिकडे गेले. आता अदानी यांनी तो उद्योग महाराष्ट्रातून तिकडे नेला नाहीय. एखादा नवा उद्योग सुरू होत असेल तर तो पाहणं आणि त्यांना शुभेच्छा देणं, यात गैर काही असू शकत नाही. पवार-अदानी भेटीनंतर आघाडीतील संभ्रम दूर होणार? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, मुंबईतील अंबानींच्या गणपतीला किती तरी राजकारणी जातात. त्यामुळं तो भाग आणि राजकारणाचा भाग वेगळा असतो, अशी गल्लत करणं योग्य नाही. शरद पवार का गेले होते हे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्याही लक्षात लवकरच येईल. मीही वडेट्टीवार यांना भेटल्यावर नक्की सांगेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

सुप्रिया सुळे लढणार : जयंत पाटील म्हणाले की, आमदार अपात्र सुनावणी ऑनलाइन झालेली योग्य होईल. विधानसभा अध्यक्षांबाबत आक्षेप घेता येणार नाहीत. निर्णयही योग्य होईल. बारामती लोकसभेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले पार्थ पवारांबद्दल मी कसं सांगू शकतो, मी आमच्या पक्षाचा उमेदवार कोण हे सांगू शकतो. तिथून सुप्रिया सुळे लढणार हे निश्चित आहे. राज्यात दुष्काळ परिस्थिती आहे. सरकार काही गांभीर्यानं घेत नाही. घेतलं तरी काही उपयोग होणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले. सरकार सध्या इव्हेंटमध्ये गुंतलेले आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केलीय.

हेही वाचा :

  1. Jayant Patil on EC : निवडणूक आयोगाला सांगूनही, आयोगाने 'तो' निर्णय दिला; आयोगाच्या निर्णयावर जयंत पाटील नाराज
  2. Jayant Patil On Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या 24 आमदारांना शरद पवार गटाकडून नोटीस
  3. Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting: उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? जयंत पाटील म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.