ETV Bharat / state

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द - Corona pandemics

सोमवतीनिमित्त क-हा नदी स्नानासाठी खंडोबाची पालखी जेजुरी गडावरून प्रस्थान करते. यावेळी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करण्यात येते. या कार्यक्रमाला राज्यभरातून भाविक येत असतात. परंतु यंदा कोरोनामुळे हा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द

author img

By

Published : Apr 12, 2021, 2:03 PM IST

पुणे - कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी देखील सर्वच धार्मिक कार्यक्रम साधेपणाने साजरे केले जात आहेत. याचा फटका जेजुरीच्या प्रसिद्ध सोमवती यात्रेला बसला असून आज (12 एप्रिल) होणारी यात्रा रद्द करण्यात आली. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्येची यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि मानकरी मंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आला.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ब्रेक द चैन अंतर्गत काही निर्बंध लादण्यात आले आहेत. यानंतर सर्व धार्मिकस्थळे बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक मंदिरांनी आपले उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय जेजुरीच्या ग्रामस्थांनी घेतला असून सोमवती अमावस्या साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व धार्मिक विधी केले जाणार

सोमवतीनिमित्त क-हा नदी स्नानासाठी खंडोबाची पालखी जेजुरी गडावरून प्रस्थान करते. यावेळी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करण्यात येते. या कार्यक्रमाला राज्यभरातून भाविक येत असतात. परंतु यंदा कोरोनामुळे हा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.

सोमवती यात्रा, पालखी जरी रद्द करण्यात आली असली तरी सर्व धार्मिक विधी केले जाणार आहेत. परंतु भाविकांना दर्शन दिले जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.