ETV Bharat / state

पुणे तेथे काय उणे! चक्क कुत्र्यासाठी घातला गोंधळ; खास सोलापूरहून आले गोंधळी

पुण्यातील धनकवडी परिसरात राहणारे नाना जाधव यांच्याकडे २ वर्षे वयाचा रॉटविलर जातीचा कुत्रा असून त्याचे नाव ब्रुनो आहे. या कुत्र्याला गॅस्ट्रो झाल्याने त्याला काही खातापिता येत नव्हते. तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना खंडोबाला नवस करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जाधव यांनी जेजुरीच्या खंडोबाला ब्रुनो आजारातून जगला तर जागरण गोंधळ घालू, असा नवस केला.

author img

By

Published : May 21, 2019, 1:48 PM IST

Updated : May 21, 2019, 1:59 PM IST

पुणे तिथे काय उणे! चक्क कुत्र्यासाठी घातला गोंधळ; खास सोलापूरहून आले गोंधळी

पुणे - आपल्या लाडक्या कुत्र्याची आजारपणातून लवकर सुटका व्हावी, यासाठी पुण्यातील एका कुटुंबाने चक्क जागरण गोंधळ घातला. एरवी एखाद्या कुटुंबामध्ये लग्नकार्य असेल तर जागरण गोंधळ घालण्याची परंपरा आहे. पण एखाद्या कुत्र्यासाठी घातलेला हा जागरण गोंधळ चर्चेचा विषय ठरत आहे.

ब्रुनोचा जागरण गोंधळ घालताना सोलापूरचे अंकू-पंकू गोंधळी...

पुण्यातील धनकवडी परिसरात राहणारे नाना जाधव यांच्याकडे २ वर्षे वयाचा रॉटविलर जातीचा कुत्रा असून त्याचे नाव ब्रुनो आहे. या कुत्र्याला गॅस्ट्रो झाल्याने त्याला काही खातापिता येत नव्हते. तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना खंडोबाला नवस करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जाधव यांनी जेजुरीच्या खंडोबाला ब्रुनो आजारातून जगला तर जागरण गोंधळ घालू, असा नवस केला.

पुणे
ब्रुनो

त्यानंतर ब्रुनो आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्यांनी बकरा कापून लोकांना जेवू घातले आणि जागरण गोंधळ घालून नवस पूर्ण केला. ब्रुनोच्या जागरण गोंधळासाठी जाधव यांनी सोलापूर येथील प्रसिद्ध गोंधळी अंकू-पंकू यांना बोलावून अगदी थाटात हा नवस पूर्ण केला. या आगळ्या वेगळ्या जागरण गोंधळाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

पुणे
ब्रुनोसोबत जाधव यांची मुलगी

यापूर्वीही जाधव यांनी रॉटविलर जातीचा कुत्रा पाळला होता. मात्र, तो १० महिन्याचा असताना, त्याला गॅस्ट्रो झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. तेव्हा आपल्या आवडीच्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने, जाधव यांची मुलगी दुःखी झाली. त्यामुळे जाधव यांनी आणखी एक रॉटविलर जातीचा कुत्रा आणला होता.

Intro:Pune:-
लाडक्या कुत्र्याची आजारपणातून लवकर सुटका व्हावी यासाठी पुण्यातील एका कुटुंबाने चक्क जागरण गोंधळाचा कार्यक्रम घातला..एरवी एखाद्या कुटुंबामध्ये लग्नकार्य असेल तर जागरण गोंधळ घालण्याची परंपरा खूप वर्षांपासून आहे...पण एखाद्या कुत्र्यासाठी घातलेला हा जागरण गोंधळ चर्चेचा विषय ठरत आहे..
Body:
पुण्यातील धनकवडी परिसरात राहणारे नाना जाधव यांच्याकडे दोन वर्षे वयाचा रॉटविलर जातीचा कुत्रा आहे..त्याचे नाव ब्रुनो. या कुत्र्याला गॅस्ट्रो झाल्याने त्याला काही खातापिता येत नव्हते..जाधव यांच्याकडे यापूर्वीही रॉटविलर जातीचा कुत्रा होता. पण तो दहा महिन्याचा असताना त्याला गॅस्ट्रो झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. परंतु मुलीला ब्रुनोचा लळा लागल्यामुळे त्यांनी तसाच कुत्रा आणला. परंतु त्यालाही गॅस्ट्रो झाला आणि आठ दिवस काहीही न खतापिता तो सलाईनवर होता.

Conclusion:तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना खंडोबाला नवस करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जाधव यांनी जेजुरीच्या खंडोबाला ब्रुनो जर या आजारातून जगला तर जागरण गोंधळ घालू असा नवस केला. त्यानंतर ब्रुनो आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्यांनी बकरे कापून लोकांना जेवू घातले आणि जागरण गोंधळ घालून नवस पूर्ण केला. यासाठी त्यांनी सोलापूर येथील प्रसिद्ध गोंधळी अंकू-पंकू यांना बोलावून अगदी थाटात हा नवस पूर्ण केला. या आगळ्या वेगळ्या जागरण गोंधळाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Last Updated : May 21, 2019, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.