ETV Bharat / state

मराठा समाजाच्या समन्वयकांनी रस्त्यावर उतरून आरक्षणाची लढाई लढावी - सदाभाऊ खोत

सरकारला मराठा, ओबीसी आरक्षण टिकवता आले नाही. सरकार शेतकरी आत्महत्या रोखू शकले नाही. सरकारने कोरोना काळात मोफत चाचण्यांची घोषणा केली. मात्र चाचण्यांनाही पैसे मोजावे लागले आहेत. त्यामुळे या सरकारने राज्यातील जनता कंगाल करण्याचे काम केले असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
author img

By

Published : Jun 20, 2021, 6:50 AM IST

दौंड(पुणे)- मराठे युद्धात जिंकले आहेत, तहात हरण्याची शक्यता असल्याने मराठा समाजाच्या समन्वयकांनी रस्त्यावर उतरून आरक्षणाची लढाई लढावी, आम्ही तुमच्या त्यांच्यासोबत राहू असे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे. ते दौंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सरकार मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे-

यावेळी बोलताना आमदार खोत म्हणाले की , महाविकास आघाडीतील सत्तेत असणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेत असून त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असते तर त्यांनी ते कधीच दिले असते. त्यांना मराठा सामाजाला आरक्षण द्यायचे नाही. पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सध्या सरकार आणि मराठा समाजाच्या समन्वयकांशी चर्चा सुरू आहे. मात्र पुनर्विचार याचिका दाखल करून ती टिकविण्यासाठी सरकारला प्रयत्न करायचेच नाहीत, जेणेकरून आरक्षणाचा चेंडू हा केंद्राच्या कोर्टात ढकलला जाईल, अशा पद्धतीने सरकार प्रयत्न करून मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे.

सरकारला मराठा, ओबीसी आरक्षण टिकवता आले नाही. सरकार शेतकरी आत्महत्या रोखू शकले नाही. सरकारने कोरोना काळात मोफत चाचण्यांची घोषणा केली. मात्र चाचण्यांनाही पैसे मोजावे लागले आहेत. त्यामुळे या सरकारने राज्यातील जनता कंगाल करण्याचे काम केले असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे , गणेश आखाडे , रयत क्रांती संघटनेचे भानुदास शिंदे , सर्फराज शेख, कुंडलिक शिंगाडे आदी उपस्थित होते.

वासुदेव काळे यांचा नागरी सत्कार -

वासुदेव काळे यांची भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शनिवारी रावणगाव ग्रामस्थांच्या वतीने काळे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदाभाऊ खोत हे उपस्थित होते. तसेच आमदार राहुल कुल यांसह मान्यवर उपस्थित होते. यानंतर दौंड येथे सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सर्वसामान्य माणसाने न्याय गुंडांकडे जावूनर मागायचा का?

खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला गुंडागर्दीचे सर्टिफिकेट असल्याचे वक्तव्य केले आहे. मग सरकारमधील पक्षाला गुंडागर्दीचे सर्टिफिकेट असेल तर आता सर्वसामान्यांनी गुंडाकडे जाऊन न्याय मागायचा का? असाही सवाल करत खोत यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.