पुणे: सध्या देशात काही विशिष्ठ लोकांकडून अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे ज्यामुळे इथं राहणाऱ्या इतर धर्मियांना भीती वाटू लागली आहे. आमचं कसं होणार अशी भावना आता त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे हिंदुराष्ट्र म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांची जी कल्पना होती ती कल्पना म्हणजे हिंदवी स्वराज्य ही कल्पना आहे. म्हणून हिंदुराष्ट्र म्हणण्यापेक्षा हिंदवी स्वराज्य म्हटल पाहिजे, असं मत एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केलं आहे. (Hindu Rashtra) (Hindavi Swarajya) (Vishwanath Karad On Hindavi Swarajya) (Shivrajyabhishek Granth Publication) (Sharad Pawar)
या मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती: शिवराज्यभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त शिवराज्यभिषेक ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, ज्येष्ठ लेखक डॉ. सदानंद मोरे, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड आणि अनिल पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिवरायांचं चरित्र अद्भूत: यावेळी विश्वनाथ कराड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या जीवनातील एक खूप मोठे आदर्श आहेत. या जगात जेवढे राजे महाराजे होऊन गेले त्यांचं जीवन चरित्र बघितलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन चरित्र बघितलं तर तो खूप अदभूत आहे. नुसतं जाणता राजा या नावाने त्यांचं वर्णन होऊ शकत नाही. सध्या देशात एक चर्चेचा विषय होत चालला आहे. त्यात लोकशाही अस्तित्वात राहणार का इथपर्यंत विषय आता होत आहे. आज देशात सर्वधर्मीय लोक हे एकत्र राहतात आणि याला 75 वर्ष झाली आहेत; पण आता या लोकांच्या मनात भीती निर्माण होत आहे की, आम्ही राहायचं कस.
त्यासाठी पवारांनी नेतृत्व करावं: सध्या नकळत काही लोक हे हिंदुराष्ट्र म्हणत आहेत; पण हिंदुराष्ट्र म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे हिंदवी स्वराज्य होत ते म्हटलं गेलं पाहिजे. हिंदू राष्ट्र बनविण्याची कल्पना कितीही चांगली आणि सुंदर असली तरी ती व्यवहार्य नाही. ती जर झाली तर या देशात अनेक वाद-विवाद तयार होतील आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य यासाठी शरद पवार यांनी राज्यातून नेतृत्व करावं, असं यावेळी विश्वनाथ कराड म्हणाले.
हेही वाचा:
- Shivrajyabhishek Ceremony in Excitement : नागपूर येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा दणक्यात साजरा करण्यात आला
- Shivaji Maharaj Coronation: छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्यभिषेक दिमाखात होणार साजरा, जाणून घ्या काय असणार कार्यक्रम
- Shivaji Maharaj Statue Goa : शिवराज्याभिषेक दिनी गोव्यात शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठ्या 23 फुटी पुतळ्याचे अनावरण