ETV Bharat / state

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे-बारामती ‘आयर्नमॅन’ धावला, अडीच तासात दौड पूर्ण करण्याचा संकल्प - ‘आयर्नमॅन’ सतीश ननावरे बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे चाहते बारामती येथील ‘आयर्नमॅन’ सतीश ननावरे यांनी पुणे-बारामती शंभर किलोमीटरच्या दौडीला आज सारसबागेतील गणरायाचे दर्शन घेवून प्रारंभ केला. पुणे-बारामती ही शंभर किलोमीटरची दौड विक्रमी अडीच तासात पूर्ण करण्याचा संकल्प सोडत त्यांनी दौडीला सुरुवात केली.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Jul 26, 2020, 6:56 PM IST

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे चाहते बारामती येथील ‘आयर्नमॅन’ सतीश ननावरे यांनी पुणे-बारामती शंभर किलोमीटरच्या दौडीला आज सारसबागेतील गणरायाचे दर्शन घेवून प्रारंभ केला. पुणे-बारामती ही शंभर किलोमीटरची दौड विक्रमी अडीच तासात पूर्ण करण्याचा संकल्प सोडत त्यांनी दौडीला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शतायुषी व्हावेत आणि त्यानिमित्त जनतेला ‘आरोग्य संदेश’ देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.

बारामती येथील वैष्णवी ग्राफिक्सचे संचालक सतीश ननावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चाहते आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार शतायुषी व्हावेत म्हणून त्यांनी पुण्यातील सारसबागेतील गणरायाचे दर्शन घेवून या दौडीला आज दुपारी सुरुवात केली. उपमुख्यमंत्री पवार हे शतायुषी होण्याबरोबरच सामान्यांना ‘आरोग्य संदेश’ देण्यासाठी त्यांनी या दौडीला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री पवार यांचे स्वीय सहायक सुनिल मुसळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

सतीश ननावरे यांनी ऑस्ट्रीया, ज्युरीस आणि स्विझर्लंड या तीन देशात ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी अष्टविनायक यात्राही विक्रमी वेळेत दौड करुन पूर्ण केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्‍ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमत्त त्यांनी तिरुपती बालाजी ते बारामती हे 1100 किलोमीटरचे अंतर सायकलवर कोठेही थांबा न घेता विक्रमी 52 तासांत पूर्ण केल्याचे ननावरे यांनी सांगितले. ननावरे यांच्या या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातील लोकांकडून कौतुक केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.