ETV Bharat / state

अभिमानास्पद! प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पुण्यातील शंखनाद पथकाला निमंत्रण

Ram Mandir Pranapratistha : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पुण्यातील केशव शंखनाद पथकाला खास निमंत्रित करण्यात आलं आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी...

Ram Mandir Pranapratistha
केशव शंखनाद पथक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 11:02 PM IST

केशव शंखनाद पथक सराव करताना

पुणे Ram Mandir Pranapratistha : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या क्षणाला ऐतिहासिक बनविण्याची तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी मोजक्याच मंडळींना निमंत्रित करण्यात आलं असताना, पुण्यातील केशव शंखनाद पथकाला देखील खास निमंत्रित करण्यात आलं आहे.

अयोध्येत शंखनाद : याबाबतचं पत्र श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महामंत्री चम्पत राय यांनी पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना दिलं आहे. ही बाब पुण्यासाठी खूपच अभिमानाची मानली जात आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या सर्वांनाच लागली आहे. त्यातच हा सोहळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या 18 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसंच 22 जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. एकीकडं श्रीरामांच्या मूर्तीचं वस्त्र हे खास पुण्यात बनत आहे, तर दुसरीकडे केशव शंखनाद पथकातील तब्बल 111 वादक हे अयोध्येत जाऊन शंखनाद करणार आहेत.

पथकात 90 टक्के महिला : याबाबत पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून केशव शंखनाद पथकाच्या माध्यमातून पुण्यातील मंदिरांमध्ये तसेच धार्मिक, गणेश मंडळांच्या मिरवणुकीत शंखानंद करण्यात येतो. आमच्या पथकात पाचशेहून अधिक वादक आहेत. यात 90 टक्के महिला आहेत. विशेष म्हणजे यात 5 वर्षे ते 85 वयोगटातील वादकाचा समावेश आहे. आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं, तेव्हा खूप आनंद झाला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी पथकाचे 111 वादक 18 जानेवारीला अयोध्येला जाणार आहेत.

प्रभू श्री रामाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना पाहायची संधी आम्हाला मिळाली आहे. विशेष म्हणजे प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठापनेला आम्ही शंखनाद करणार आहोत. 7 दिवसाच्या या कार्यक्रमात पथकाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमात शंखनाद करण्यात येणार आहे - नितीन महाजन

श्रीरामांच्या मूर्तीचे वस्त्र पुण्यात तयार : प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या श्रीरामांच्या मूर्तीचे वस्त्र हे खास पुण्यातून दिले जाणार आहे. पुण्यातील अनघा घैसास यांच्या हँडलूम संस्थेकडून श्रीरामाचे वस्त्र तयार करण्यात आले आहे. तसंच ज्या भाविकांना श्री राम मंदिराच्या उभारणीमध्ये आपलं योगदान द्यावं वाटतंय, त्यांच्यासाठी 'दो धागे श्रीराम के लिये' हा खास उपक्रम राबवण्यात आलाय. 10 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. मराठा आरक्षणाची लढाई लढण्यात महाविकास आघाडीला रस नव्हता - चंद्रकांत पाटील
  2. मराठा आरक्षण मुद्द्यावर भाजपा आमदार सुभाष देशमुख स्पष्टच बोलले; 'फेब्रुवारीपर्यंत तरी'
  3. कोणाला आरक्षण दिलं पाहिजे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.