पुणे - जिल्ह्यातील उत्तर आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक राहतात. जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन प्रभात फेरी काढून जागतिक आदिवासी दिवस साजरा केला. विविध कार्यक्रमांमधून आदिवासी समाजाकडून संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले.
आदिवासी समाज हा नेहमी सर्वच घटकांपासून वंचित असतो. परंतू, सद्या चित्र बदलत आहे. या समाजातील तरुणपिढी शिक्षण घेत असल्याने या समाजाचे शहरी भागातील वास्तव्य वाढले आहे.
जागतिक आदिवासी दिवस साजरा होत असताना काही समाज आजही अनेक घटकांपासून दूर आहे. त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.