पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कांदा, बटाटा, ऊस शेती व इतर तरकारी मालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी या 3 तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज किंवा सरकारच्या माध्यमातून त्वरित मदत देण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा - राम मंदिर-बाबरी मस्जिद निकालाप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस सतर्क
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागामध्ये बटाटा हे एकमेव पीक घेतले जाते. मात्र, लागवडीपासून परतीच्या पावसाचा फटका बटाटा पिकाला बसला आहे. त्यामुळे लागवड केलेला बटाटा मातीतच सडला आहे. त्यामुळे बटाटा हे पीक उगवलेच नाही. मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेले बटाटा पीक आज मातीत गेले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या भावना विभागीय आयुक्तांसमोर मांडल्या.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड
दरम्यान, विभागीय आयुक्तांनी या परिसरातील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळेल, असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.