ETV Bharat / state

Independence Day 2023 : ध्वज मोफत धुवून, इस्त्री करून बाप-लेकाची देशसेवा; पाहा स्पेशल रिपोर्ट - मोहम्मद शरीफ शेख

देशाबद्दलची राष्ट्रभावना कोणीही शब्दात व्यक्त करत नाही ती प्रत्येकाच्याच मनात असते. तर पुण्यातील पिंपळगाव या गावातील 64 वर्षीय शंकरराव भागवत हे तिरंगा झेंडा धुवून, तिरंग्याला इस्त्री करून अनोखी देशसेवा पार पाडत आहेत. त्यांच्या या देशसेवेत त्यांची मुले किशोर भागवत आणि वैभव शंकर भागवत हे देखील त्यांना मदत करतात.

Pune News
पुण्यातील अनोखी देशसेवा
author img

By

Published : Aug 15, 2023, 2:14 PM IST

Updated : Aug 15, 2023, 2:50 PM IST

प्रतिक्रिया देताना देशभक्त शंकरराव भागवत

पुणे : स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांसह विविध मंडळे संस्था, संघटना शाळा येथे सकाळपासूनच हातात तिरंगा घेत स्वतंत्र दिन साजरा केला जात आहे. अशातच पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील 64 वर्षीय देशभक्त स्वतः तिरंगा धुवून, त्याला इस्त्री करून संपूर्ण गावातील शासकीय कार्यालये, शाळा, दूध डेअरी, बँक अशा अनेक ठिकाणी देण्याचे काम गेली 50 वर्षांपासून करत आहे.

बाप लेकांची अनोखी देशसेवा : देशभरात सर्वत्र स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथे राहणारे शंकरराव पांडुरंग भागवत हे १९७२ पासून या गावात राहतात. सुरुवातीच्या काळात त्यांनी लोकांचे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. नंतर शंकरराव भागवत हे तिरंगा झेंडा धुवून, तिरंग्याला कडक इस्त्री करून अनोखी देशसेवा करण्यास सुरूवात केली. विशेष यासाठी ते एक रुपया देखील मानधन घेत नाहीत. यामध्ये त्यांची दोन्ही मुले देखील त्यांना साथ देत आहेत.

शंकरराव पांडुरंग भागवत हे १९७२ पासून पिंपळगाव गावात राहतात. सुरुवातीच्या काळात त्यांनी लोकांचे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. नंतर स्वतः तिरंगा धुवून, त्याला इस्त्री करून संपूर्ण गावातील शासकीय कार्यालये, शाळा, दूध डेअरी, बँक अशा अनेक ठिकाणी देण्याचे काम गेली ५० वर्षांपासून करत आहे. - शंकरराव पांडुरंग

दुसरी पिढी जपते देशसेवेची परंपरा : सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या बाळासाहेब यांना देश सेवेची प्रचंड आवड आहे. देशासाठी काय करता येईल हा विचार त्यांना येत होता. तेव्हा त्यांनी त्याच्या मनात एक विचार आला की, आपण आपल्या देशाचे प्रतीक असलेल्या तिरंगा झेंडा हा गावतील सर्व शासकीय कार्यालये येथे फडकवला जातो. तो धुवून आणि त्याला इस्त्री करून द्यायचा. तेव्हापासून त्यांना ही सवय लागली. भागवत हे दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी गावातील प्रत्येक शाळा महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालय येथे जो झेंडा दिला जातो. त्याला इस्त्री करून ते देतात. गेली ५० वर्ष ती हे सेवा करत आहेत. त्यांच्या या देशसेवा त्यांची मुले किशोर भागवत आणि वैभव शंकर भागवत हे देखील त्यांना मदत करतात.

पुण्यातील शेख कुटुंबीयांची देशसेवा : मोहम्मद शरीफ शेख यांनी 50 वर्षांहून अधिक काळापासून झेंडे बनविण्याचे काम सुरू केले आणि पाहता-पाहता हे झेंडा बनविण्याचे काम आज त्यांच्या चौथ्या पिढीपर्यंत येऊन पोहचले आहे. शेख कुटुंबातील सर्वचजण पुरुष मंडळी तसेच महिला, सून हे देखील आज तिरंगा बनवण्याचे काम करत आहे. ही मंडळी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या चार महिन्यांपूर्वीपासून तयारी करतात. तर स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी शहरभर चक्क लाखभर झेंडे शेख कुटुंबीयांकडून पुरवले जातात. ( independence day )

हेही वाचा -

  1. Independence Day 2023 : पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना घातला रुबाबदार फेटा अन् कुर्ता, जाणून घ्या पोशाखाचे वैशिष्ट्ये
  2. India independence Day 2023 Updates: बापुंच्या स्वप्नातील भारत साकारायचा आहे-पंतप्रधान मोदी
  3. Independence Day 2023: राज्यातील 186 कैद्यांची आज कारागृहातून होणार सुटका..जबाबदार नागरिक होण्याचे पोलीस महासंचालकांचे आवाहन

Last Updated : Aug 15, 2023, 2:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.