इंदापूर - सध्या राजाच्या राजकारणात दररोज नव नवीन घडामोडी घडत आहेत. ( Teacher Resigns To Support Uddhav Thackeray ) शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. तर अनेकजण आता शिवसेनेत प्रवेश ही करत आहेत. त्यातच इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शनवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.
![उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी इंदापूरच्या शिक्षकाचा राजीनामा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-baramati-political-av-10060_29072022134314_2907f_1659082394_983.jpg)
पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम - दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवून "शिवसेना" या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
उपशिक्षक पदावर - खरात हे वालचंदनगर इंडष्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ते 1 / 2/ 2002 पासून सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र.3 येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंतची सेवा 20 वर्ष सहा महिने इतकी झालेली आहे.
हेही वाचा - CM Visit To Delhi: मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीची चर्चा जोरात! मात्र, दौरा केलाचं नसल्याचा सरकारकडून दावा