ETV Bharat / state

बारामतीतील कोरोना परिस्थिती गंभीर, उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत अंथरल्या खाटा - बारामती लेटेस्ट न्यूज

बारामतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांसाठी बेड कमी पडत आहेत. हे लक्षात घेऊन, बारामतीमधील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन, कोरोना रुग्णांसाठी 60 बेडचे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड सेंटर सुरू केले आहे.

उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत अंथरल्या खाटा

author img

By

Published : Mar 31, 2021, 11:02 PM IST

बारामती - कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पूर्णक्षमतेने भरलेली रुग्णालये, रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी नातेवाईकांची घालमेल आणि आपल्याला उपचार मिळणार का या शंकेने हतबल झालेले रुग्ण अशी परिस्थिती असते. मात्र बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयात काहीस वेगळ चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रुग्णालयातील हॉल व प्रवेशद्वा जवळच्या प्रतीक्षा कक्षात कोरोना रुग्णांसाठी 60 बेड तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ही सर्व परिस्थिती पाहिल्यास बारामतीतील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे.

बारामतीत शासकीय मेडिकल कॉलेज, तीन नटराज असे चार कोविड केअर सेंटर, रुई आणि सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल आणि बारामती हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र बारामतीत १५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने बेडचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण यांच्या टीमने तातडीने हालचाली करून, साठ बेडस, साठ बेडशीट, गाद्या यांची उपलब्धता करुन देत, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात आणखी एक तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड सेंटर उभारले आहे.

सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात कोरोनाबाधितांची गर्दी

बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना औषधोपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने, अनेक जण सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. रुग्णालयातील सर्व बेड रुग्णांनी व्यापले आहेत. मात्र असे असताना आज आणखी 60 कोरोनाबाधितांना बेडची आवश्यकता होती. त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही, अशा रुग्णांसाठी रुग्णालयामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे संस्थात्मक विलगिकरण कक्ष कमी पडत आहेत, त्यामुळे शासनाने गृहविलगिकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.