ETV Bharat / state

Missing Girls Statistics Pune: धक्कादायक! पुण्यात बेपत्ता मुलींच्या आणि बलात्काराच्या घटनेत वाढ - तंत्रज्ञानाद्वारे शोधणार बेपत्ता मुली

पुणे शहराला विद्येचे माहेरघर तसेच सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. असे असले तरी धक्कादायक बाब म्हणजे, पुणे शहरातून मुलींचे आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

Missing Girls Statistics Pune
रुपाली चाकणकर
author img

By

Published : Jun 11, 2023, 10:26 PM IST

बेपत्ता मुलींविषयी रुपाली चाकणकर आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: रुपाली चाकणकर म्हणाल्या की, यंदाच्या वर्षी पुणे शहरात जानेवारी ते मे या पाच महिन्यात 220 मुली बेपत्ता झाल्या आहेत. यापैकी 167 मुली मिळून आल्या आहेत. तर 54 मुली अजूनही बेपत्ता आहेत. मागील 5 महिन्यात महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण हे 845 असून त्यातील 496 महिला सापडल्या आहेत. तर 349 महिला अजूनही बेपत्ता आहेत. या प्रकरणी सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ही आहे धक्कादायक आकडेवारी: पुणे शहरात 2022 साली बलात्काराच्या 185 घटना घडल्या होत्या. बेपत्ता मुलींची आकडेवारी 491 होती. त्यापैकी 444 मुली सापडल्या. पण 47 मुली अजूनही बेपत्ता आहेत. तसेच 1805 महिला बेपत्ता होत्या. यात 1317 महिला या मिळून आल्या आहेत. तर अजूनही 488 महिला या बेपत्ता आहेत. यंदाच्या वर्षी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत 220 मुली या बेपत्ता आढळल्या. यापैकी 167 मुली मिळाल्या आहेत तर 54 मुली अजूनही बेपत्ता आहेत. या 5 महिन्यात महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण हे 845 आहे. त्यातील 496 महिला मिळून आल्या आहेत. तर 349 महिला या अजूनही बेपत्ता आहेत.

मुलींची आखाती देशात तस्करी? पुणे शहरात मोठ्या प्रमाणात मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना आखाती देशांमध्ये घेऊन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तिथे गेल्यावर या महिलांची सुटका होत नाही. महाराष्ट्र राज्यातून १६ ते ३५ वयाच्या मुली, महिला बेपत्ता होत असल्याचे वाढते प्रमाण ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ह्यामध्ये मानवी तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कटाचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे, असेही चाकणकर म्हणाल्या.

तंत्रज्ञानाद्वारे शोधणार बेपत्ता मुली: यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपण जो विषय मांडला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. सध्या राज्याचे पोलीस खाते हे खूप चांगले काम करत आहे. आता एक नवीन तंत्र आले आहे ज्यात मोबाईल जरी बंद असला तरी सिग्नल पकडला जातो आणि आपल्याला तो माणूस शोधता येतो. याची दखल घेत येत्या 15 तारखेला पोलिसांबरोबर बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचा:

  1. Saraswati Vaidya Murder Case: सरस्वती वैद्यचा मृतदेह उद्या बहिणींना देणार, पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर
  2. Sim Card Scam: तुमच्या दस्तावेजावर काढलेल्या सिमकार्डवरून घडू शकतो गुन्हा; जाणून घ्या सविस्तर...
  3. बदनामी प्रकरणी नितेश राणे विरोधात संजय राऊत न्यायालयात, अब्रुनुकसानीचा दावा शिवडी न्ययालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.