पुणे: आज सकाळपासूनच आयकरचे अधिकारी हे 30 ते 25 गाड्यांमध्ये पुण्यात दाखल झाले होते. सिटी ग्रुप हा जो अनिरुद्ध देशपांडे यांचा बांधकाम व्यवसायाचा ग्रुप आहे. त्यांच्या कार्यालयावरती छापीमारी केली आहे. आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्राची तपासणी करता आहेत. जी काही माहिती त्यांना हवी आहे ती माहिती घेत आहेत. अनिरुद्ध देशपांडे मात्र कार्यालयात आहेत का नाहीत हे मात्र आणखी समजू शकले नाही.
सर्वच राजकीय पक्षांशी संबंध: गेल्या काही दिवसापासून पुण्यात बांधकाम व्यवसाय वरती छापे पडत आहेत. प्रामुख्याने अमोनोरा टाऊनशिप ही या सिटी ग्रुपची आहे. पुण्यातीलच अनेक प्राईम लोकेशनच्या ठिकाणी सिटी ग्रुपचे साईट चालू आहेत. पुण्यामध्ये अनिरुद्ध देशपांडे यांच्या सिटी ग्रुपचे बांधकाम व्यवसाय मध्ये खूप मोठे नाव आहे. हडपसर भागातील अमानोरा टाउन नावाची टाउनशिप हे त्यांची प्रसिद्ध आहे. अनिरुद्ध देशपांडे यांचे सर्वच राजकीय पक्षांसोबत सुद्धा चांगले संबंध असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या छापीमारीतून आयकर विभागाला काय माहिती मिळते ते पाहणे महत्त्वाचे आहे.
कारवाईकडे अनेकांच्या नजरा: शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आयकर विभागाने पुण्यात एकूण 8 ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे. आता या धाडसत्रातून काय निष्पन्न होणार, ते पाहावे लागेल. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. आयकर विभागाने मंगळवारी बीबीसी वृत्तसंस्थेच्या कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केले होते. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज आयकर विभागाकडून पुण्यात छापे टाकण्यात आले आहेत.
बीबीसी कार्यालयात झडती: बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात आयकर विभागाची टीम मंगळवारी पोहोचली होती. कार्यालयाचे सर्वेक्षण करण्यात आले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयात झडती घेतले. बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील दोन भागांची माहितीपट इंडिया: द मोदी प्रश्न प्रकाशित केल्यानंतर काही आठवड्यांच्या आतच आयकर विभागाने छापे टाकल्याने चर्चा सुरु झाली आहे.
करचोरी प्रकरणी छापे: आयकर विभागाने मंगळवारी बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये करचोरी तपासणीचा एक भाग म्हणून सर्वेक्षण केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 2002 च्या गुजरात दंगली आणि भारतावर दोन भागांची माहितीपट प्रसारकाने प्रसारित केल्यानंतर काही आठवड्यांनंतर आश्चर्यकारक कारवाई झाली. विभाग कंपनीच्या व्यावसायिक कामकाजाशी संबंधित कागदपत्रे आणि तिच्या भारतीय शाखांशी संबंधित कागदपत्रे पाहत आहे, असे ते म्हणाले होते.