पुणे : पुण्यातील औंध परिसरात एका इमारतीत 3 मृतदेह सापडले आहेत. या घटनेने पुणे शहर परिसरात खळबळ उडाली आहे. औंध परिसरातील एका इमारतीत पती, पत्नी, मुलगा असे तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत.
तीघांची आत्महत्या : आयटी अभियंता असलेल्या तरुणाने आपली पत्नी, 9 वर्षाच्या मुलाची पॉलिथीन पिशवीने दाबून हत्या केली आहे. त्यांनतर पतीने गळफास लावून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पत्नी प्रियांका सुदिप्तो गांगुली (वय ४०), मुलगा तनिष्क गांगुली (वय ०८), पती सुदिप्तो गांगुली (वय ४४) यांचा समावेश आहे. हा तरुण पश्चिम बंगालचा असून तो पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे. खून, आत्महत्या नेमकी कशामुळे झाली याचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकं काय झालं?: काल संध्याकाळनंतर सुदीप्तो फोन उचलत नव्हता. त्यानंतर सुदिप्तोच्या भावाने मित्राला घरी जाण्यास सांगितले. मित्र घरी गेल्यानंतर त्याला दरवाजा बंद असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी लोकेशन ट्रेस केले असता ते घरात असल्याचे दिसून आले. दरवाजा तोडल्यानंतर सुदीप्तोने एका खोलीत गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. तर दुसऱ्या खोलीत पत्नी,मुलगा मृतावस्थेत आढळून आला आहे.
हत्येचे कारण अद्याप अपस्ष्ट : तरुण पश्चिम बंगाल चा असल्याचे कळत असून, तो पुण्यात एका आय टी कंपनीमध्ये काम करत होता. नेमकी हत्या, आत्महत्या कशामुळे केली याचा तपास सुरू आहे. पुण्यामध्ये आयटी इंडस्ट्री मोठी असल्याने अनेक आयटी इंजिनिअर सुद्धा या भागात राहतात. वेगवेगळ्या प्रांतातून आलेले हे सगळे लोक जॉब साठी पुण्यात येत असतानाच,अशा घटना सुद्धा आता पुण्यात घडताना दिसत आहेत. नेमके या तिघांच्या आत्महत्याच कारण आणखी पोलिसांना सुद्धा समजलेले नाही. चतुर्श्रुंगी पोलिसाचे अधिकारी याचा तपास करत आहेत. परंतु प्राथमिक माहितीनुसार या तरुणांनीच आपल्या पत्नीला, 9 वर्षीय मुलाला गळ्याला फास दिला. नंतर स्वतःही आत्महत्या केली आहे.